साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावा या मागणीसाठी : अभिषेक वैराट यांचे आमरण उपोषण
पुणे : दि. 28/7/23 (रविवार) अण्णाभाऊ साठे पुतळा सारसबाग पुणे येथे महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजातील कलावंत, साहित्यीक, महाराष्ट्राच्या लढ्याचे नायकं असलेले साहित्यरत्न लोकशाहिर आणाभाऊ साठे यांना ‘मरणोत्तर भारतस्त्न’ पुरस्काराने सन्मानित करावे या मागणीसाठी अभिषेक वैराट व लहुजी गायकवाड आज पासुन आमरण उपोषणास बसले आहेत.
साहित्यरत्न तुकाराम (आण्णाभाऊ) भाऊराव साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान महत्वपूर्ण मानले जाते. ते साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमाणसात रूजलेली असल्यामूळे मातंग समाजासह आंबेडकरी चळवळीने देखील धरणे आंदोलने, मोर्चे केल्यामुळे विविध नामवंत साहित्यिकांनी आणि राजकीय नेत्यांनी आण्णाभाऊंना ‘मरणोत्तर भारतरत्न’ देऊन सन्मानित करावे अशी मागणी सर्वस्तरावर अनेक वर्ष करण्यात येत आहे, परंतू राज्याचे सहकार मंत्रालय केवळ केंद्राला प्रस्ताव सादर करून आणाभाऊंच्या चाहत्यांना गाजर दाखवत असल्याने आणाभाऊंचा चाहता व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते म्हणुन पुण्याच्या सारसबाग येथील आण्णाभाऊ साठे पुतळयाजवळ आमरण उपोषणास बसले आहेत.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावा या मागणीसाठी पुन्हा सरकारला जाग येण्यासाठी उपोषण करण्यास सुरुवात केलेली आहे. या उपोषणाला सर्व स्तरातून सामाजिक राजकीय संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. परंतु अभिषेक वैराट व त्यांचे सहकारी लहुजी गायकवाड हे पावसामध्ये कुठलीही शासनाने व्यवस्था न नसतांना सुद्धा उपोषणास बसलेले आहेत. ही बाब लक्षात घेता पुणे शहरातील विविध सामाजिक संघटनांनी प्रशासनावर रोष निर्माण केलेला आहे. तरी हे उपोषण यशस्वी होण्यासाठी सर्व संघटनांनी राजकीय पक्षांनी व पुणे शहरातील बहुजन समाज्याने आपापल्या परीने उपोषणस्थळी जाऊन पाठिंबा देत आहेत,
अभिषेक वैराट व लहुजी गायकवाड यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक सारसबाग पुणे येथे भेट द्यावी.असे आव्हान उपोषण समितीचे प्रवक्ते सतीश गायकवाड यांनी केले आहे.




