भोर तालुक्यातील संगमनेर- माळवाडी ग्रामपंचायती मध्ये राजकीय भुकंप
भोर : भोर तालुक्यातील संगमनेर माळवाडी ग्रामपंचायतीच्या एकुण 9 सदस्या पैकी 5 सदस्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. तरी ही सरपंच, उपसरपंच पद शाबुत,भोर गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे यांच्याकडे 5 सदस्यांनी राजीनामे दिले. राजीनामे मंजुर करण्याचा सर्वस्वी अधिकार सरपंचांना आहे.
Advertisement
संगमनेर माळवाडी गावच्या सदस्यानी राजीनामा देण्याचे कारण काही कळू शकले नाही, राजीनामा देणाऱ्या सदस्यांमध्ये 1) आत्माराम आबुराव बांदल, 2) अमोल प्रकाश शेलार, 3) अनिल भगवान पवार, 4) मनिषा कृष्णकांत नेवसे, 5) शुभांगी अक्षय देशमख या सर्वांची नावे आहेत.
गट विकास अधिकारी किरणकुमार धनावडे यांच्याकडे संगमनेर माळवाडी ग्रामपंचायतीच्या 5 सदस्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. ते संगमनेर ग्रामपंचायतीला मंजुरीसाठी पाठविले आहेत.
Advertisement




