शंभूतीर्थ कापूरहोळ मध्ये ७२ वा अखंड हरिनाम सप्ताहा मोठ्या उत्सवात सुरू
कापूरहोळ: शंभुतीर्थ कापूरहोळ येथे अखंड हरीनाम सप्ताह सोहळा दि.19 फेब्रुवारी 2025 (बुधवार) सुरू झाला असुन या सप्ताह काळात दैनंदिन सकाळची काकडा आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, सायंकाळी हरिपाठ, किर्तन, आणि रात्री पंचक्रोशीतील भजनी मंडळाचा जागर असा दिनक्रम आहे.
विणा पूजन करून विधीपूर्वक पूजापाठ तसेच महाआरतीने अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली. कापूरहोळ गावच्या या सप्ताहाचे हे ७२ वे वर्ष असून“ सकाळी १० च्या सुमारास गावातील श्री विठ्ठल मंदिरात ज्येष्ठ ग्रामस्थांच्या उपस्थितीत या सप्ताहाची सुरुवात झाली. यावेळी ह.भ.प.तळेकर महाराज, माजी उपसरपंच उत्तम गाडे, माजी सरपंच ज्ञानेश्वर गाडे, खंडूतात्या गाडे, जनार्धन गाडे,चंद्रकांत देवघरे, सुदाम गाडे, विवेक गाडे, पांडुरंग गाडे,चंद्रकांत गाडे, राहुल गाडे, राजेंद्र वाघमारे, मस्कोबा गाडे, सागर गाडे, प्रवीण देवघरे, प्रशांत गाडे, अजिंक्य गाडे, तसेच महिला भगिनी मिना गाडे, संगीता गाडे, ललिता देवघरे, स्वाती गाडे, प्राजक्ता दळवी, सई गाडे हे मान्यवर उपस्थित होते.
सात दिवस अखंड हरिनामाचा जयघोष होणार असल्याने परिसरात भक्तिमय वातावरण आहे. सप्ताहानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या काळात मंदिरात पहाटे ५ वाजता काकड आरती, संत तुकाराम गाथा भजन, ज्ञानेश्वरी पारायण असते. सायंकाळी हरिपाठ, प्रवचन आणि रात्री ९ वाजता किर्तन असते, रात्री पंचक्रोशीतील भजनी मंडळांचा जागर असतो.




