सामाजिक

आमिर खानने घेतली सरपंच संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट


 

पुणे : बालवाडी स्टेडियम येथे 24 मार्चला पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात अमिर खानने संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली त्यांचा मुलगा विराज देशमुख आणि धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला व त्यांचे सांत्वन केले त्यांना धीर दिला. आमिर खानने विराज देशमुखला पोटाशी धरून घट्ट मिठी मारली.

संतोष देशमुख यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमिर खान मदतीला धावून आला आहे. पाणी फाउंडेशन मस्साजोग येथे काम करणार आहे. सध्या मस्साजोग येथे नाम फाउंडेशनच्या वतीने नदी खोलीकरण रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आलं आहे, अशी माहिती मिळतीये. त्यामुळे आता बीडमधील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आमिर खानने एक पाऊल पुढं टाकलं आहे.

Advertisement

पाणी फाउंडेशनचे काम आता संपूर्ण महाराष्ट्रात होणार असल्याची घोषणा आमिर खान याने पुण्याच्या कार्यक्रमात केली. पुढील वर्षा पासून महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पाणी फाउंडेशन काम करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. पानी फाउंडेशनची वाटचाल मी बघतोय. आमिर यांना परफेक्शनिस्ट म्हणतात, त्यांना प्रत्येक क्षेत्रात परफेक्षण येत नाही तोपर्यंत ते थांबत नाहीत, असं म्हणत फडणवीसांनी आमिर खान बद्दल गौरव उदगार शब्द काढले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!