OBC नेते लक्ष्मण हाके यांचे दहा दिवसानंतर उपोषण स्थगित
जालना : 22/06/2024 (शनिवार) दुपारी सव्वा दोन वाजता शासनाचे शिष्टमंडळ जालन्यातील उपोषणस्थळी वडीगोद्री येथे दाखल झाले. शिष्टमंडळ आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यात सकारात्मक चर्चा झाली व त्यानंतर हाके यांनी उपोषण तूर्तास स्थगित करत असल्याची घोषणा केली.
Advertisement
शिष्टमंडळाच्या हाताने पाणी पिऊन हाके यांनी आपले उपोषण सोडले. दोन-तीन मागण्या सोडल्या तर सर्वच मागण्या पूर्ण झाल्या आहेत, सगेसोयरेचा आदेश अजून आलेला नाही. तो सर्वपक्षीय बैठकीनंतर निघेल, असे शासनाचे आश्वासन ग्राह्य धरून उपोषण स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर मागण्यांवर शासनाची श्वेत पत्रिका मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे हाके यांनी जाहीर केले.
Advertisement




