क्राईम

पुण्यातील 29 रक्तपेढ्याचे परवाने रद्द ; नियमाचा भंग करुन परराज्यात रक्त आणि रक्त घाटिकांची विक्री.


संतोष आडसुळ,
प्रतिनिधी.

पुणे : पुण्यातील 29 रक्तपेढ्यांना शासनाने दणका दिलेलेला आहे नियम भंग करणाऱ्या शहरातील 29 रक्तपेढ्यांचे परवाने हे शासनाकडून रद्द करण्यात आले आहेत, पुणे विभागात रक्ताचा तुटवडा असताना काही रक्त पिढ्यांनी नियमांचा भंग करून परराज्यात रक्त आणि रक्त घटिकांची विक्री केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रक्तपिढ्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई कऱण्यात आली असुन, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून शहरातील 81 संस्थाची तपासणी करण्यात आली त्यापैकी 29 जणांचा परवाना रद्द करण्यात आला आहे, तर 32 रक्त पेढ्याना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे,

अन्न व औषध प्रशासन यापुढे या सगळ्या रक्त पेढ्यांवर काय कारवाई करतात ते पाहावं लागेल मात्र सर्वसामान्यांना रक्त उपलब्ध होत नसताना अशा प्रकारे रक्ताची विक्री परराज्यात करणं हा नियम भंग आहे त्याविरुद्ध ही सगळी कारवाई अन्न व औषध प्रशासनाने आता सुरू केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!