क्राईम

पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ; वडिलांना खांद्यावर घेऊन जल्लोष


अहिल्यानगर :  67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्या मध्ये झाला, या सामन्यांमध्ये पृथ्वीराज मोहोळ यांने महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावला. या विजयानंतर पृथ्वीराज मोहोळच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला, कुस्ती क्षेत्रात नव्या दमाच्या पैलवानाने महाराष्ट्र केसरी जिंकून पुण्याच्या कुस्ती संस्कृतीचा लौकिक वाढवला, अशी भावना समर्थकांनी व्यक्त करण्यात केली.

Advertisement

पृथ्वीराज मोहोळ याने अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला चितपट करत हा अटीतटीचा सामना जिंकला, पृथ्वीराज मोहोळला अजित पवारांच्या हस्ते चांदीची गदा देण्यात आली. यानंतर उपस्थित पैलवानांनी पृथ्वीराज मोहोळला खांद्यावर उचलून जल्लोष केला. तर दुसरीकडे माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणत वडिलांना खांद्यावर घेऊन मोहोळने मैदानात जल्लोष करत फिरत होता.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!