भोर मध्ये संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्सवात साजरा
स्वराज्याचे संस्थापक, बहुजन प्रतिपालक, लोक कल्याणकारी राजा, ” छत्रपती शिवाजी महाराज ” यांची जयंती दिनांक १९ फेब्रुवारी तसेच एकोणिसाव्या शतकात समाजात पसरलेल्या अस्पृश्यता, सतीप्रथा, बालबिवाह, विधवा- विवाह, अंधश्रद्धा या सारख्या अनेक समाजविघातक प्रथांना विरोध करत, बहुजनांबरोबर स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे, क्रांतिसूर्य, राष्ट्रपिता ” महात्मा ज्योतिबा फुले ” यांची जयंती दिनांक ११ एप्रिल व बहुजनांचे, दलितांचे, शोषितांचे, शेतक-यांचे, कष्टक-यांचे, स्त्रियांचे उद्धारकर्ते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, राष्ट्रनिर्माते, ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” यांची जयंती दिनांक १४ एप्रिल या संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त त्यांच्या विचारांना व आठवणीना उजाळा देण्यासाठी आंबेडकर युवा भोर तालुका यांच्या वतीने रविवार दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा भोर शहर येथे संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
भोर चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुड पुतळास अभिवादन करून आकर्षक देखाव्या सहित भव्य – दिव्य मिरवणूक काढण्यात आली, मिरवणूक एस. टी स्टॅन्ड जवळील महापुरुषांच्या पुतळ्या जवळ आल्यानंतर सर्वांनी मिळुन सामुहिक बुद्ध वंदना घेतली व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले, त्यानंतर उपस्थित वक्त्यांची भाषणे झाली व भोर नगरपालिकेतील सफाई कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला, तसेच १००० पुस्तकांचे उपस्थित अनुयायांना वाटप करण्यात आले, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, जिजाऊ, सावित्री, रमाई यांच्या जीवन कार्याबाबत लिखित १००० पुस्तके उपस्थित अनुयायांना वाटप करण्यात आलीत. तसेच उपस्थित सर्व अनुयायांना भोजन व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर भीमगीतांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमा बाबत आंबेडकर युवा कार्यकर्त्याचे विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
- विशेष बाब म्हणजे स्वराज महाराष्ट्र न्यूज़शी बोलताना सर्वच कार्यकर्त्यांनी विनंती केली की आम्हां कोणा एकटयाला या कार्यक्रमाचे श्रेय देऊ नका हा कार्यक्रम सर्वच समाज बांधावामुळे यशस्वी झाला आहे. त्यामुळे आंबेडकर युवाच्या कार्यकर्त्यांनी समाज बांधावाचे आभार मानले.
—————————————




