ग्रामपंचायत किकवी येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
भोर : ग्रामपंचायत किकवी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोटोला युवा सरपंच नवनाथ सयाजी कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, भास्कर सकपाळ, मौलादीन शेख, अभिमन्यू कोंढाळकर, कदम, पंकज कदम, सचिन कदम, चंदन कदम व ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ उपस्थित होते.
युवा सरपंच नवनाथ कदम यांनी भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना शिक्षण, मतदानाचा, संपत्तीचा हक्क, प्रसुती रजेचा लाभ, कर्मचाऱ्यांची पेन्शन योजना, भारतीय रिझर्व्ह बॅंकेची स्थापना, सिंचन सोयींसाठी देशात पहिले धरण उभारण्याचे पाऊल, देशाचा कारभार चालतो ते संविधान आणि अशा कितीतरी मानवी हक्काच्या, हिताच्या गोष्टी करीत आधुनिक भारताच्या जडणघडणीत सिंहाचे योगदान देणारे युगपुरुष, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती किकवी गावात मोठ्या उत्साहात साजरी केली.
यावेळी भोरहुन ज्योत आणली गेली, त्यानंतर गावातुन भव्य मिरवणुक काढण्यात आली, तसेच प्रमुख मान्यवरांची भाषण झाली, ग्रामपंचायत किकवी यांच्या मार्फत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, त्यानंतर सर्वाना खाऊ वाटप करण्यात आला,गरजु विद्यार्थांना शालेय वस्तुचे वाटप करण्यात आले, या कार्यक्रमला गावातील ग्रामस्थ, तरुण मंडळ, महिला मंडळ मोठ्या संखेने उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्यामुळे युवा सरपंच नवनाथ कदम यांनी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांसह महिला मंडळाचे आभार मानले.




