सामाजिक

शंभूतीर्थ कापुरहोळमध्ये माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी


कापुरहोळ : भोर तालुक्यातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या दुधाई वीर धाराऊ माता गाडे यांच्या ऐतिहासिक कापूरहोळ गावामध्ये माघी श्री गणेश जयंती अर्थात विनायक चतुर्थी मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने साजरी करण्यात आली. गणपती मंदिरामध्ये सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 12 : 00 वाजता गणेश जयंतीचा सोहळा पार पडला.  महिला भगिनींनी जन्मोत्सवाचा जल्लोष भक्ती भावाने साजरा केला.

माघ शुद्ध चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते. गणेश जयंतीनिमित्त गणपती मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. गणेशमूर्तीला फुलांची मनमोहक सजावट केल्यामुळे मूर्ती लक्ष वेधून घेत होती. सकाळपासून भाविकांची मंदिरात गर्दी झाली होती. जन्मकाळाचा पाळणा म्हणण्यासाठी महिलांची संख्या मोठी होती. जन्मकाळाचा पाळणा म्हंटल्यानंतर गणेशाची महाआरती म्हणण्यात आली. दिवसभरात हजारो भाविकांनी गणेशाचे दर्शन घेतले.

Advertisement

वीर धाराऊ माता तरुण मंडळ गेल्या 21 वर्षापासून श्री गणेश जयंती उत्सव साजरा करत असून श्री गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन गणपती मंदिरांमध्ये करण्यात आले होते. सर्वत्र गणेश याग, होम हवन, सत्यनारायण महापूजा, श्री गणेश आवर्तने, श्री गणपती बाप्पांची भजने, किर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रमांनी कापूरहोळ परिसर भक्तिमय झाला होता.

मोठ्या प्रमाणात महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या. जन्म सोहळ्यानंतर महाआरती घेण्यात आली व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले तसेच सर्वच भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला, श्री गणपती मंदिरामध्ये सकाळपासूनच कापूरहोळ पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!