सामाजिक

भोर-मुळशी-राजगड (वेल्हा) मधील नागरिकांची दिवाळी होणार गोड




 

बावधन : किरण दगडे पाटील यांच्या अभिनव उपक्रमाअंतर्गत दिवाळी फराळसाठी साहित्य (किराणा) वाटपाचे भव्य नियोजन करण्यात आले आहे. सालाबाद प्रमाणे ते याही वर्षी हा उपक्रम राबवत आहे.

गेल्या 9 वर्षांपासून अखंडपणे कोथरूड-बावधन मध्ये सुरु असलेला दिवाळी फराळ साहित्य वाटप उपक्रम आता भोर- मुळशी-राजगड (वेल्हा) मधील नागरिकांसाठी देखील राबविण्याचे नियोजन केले आहे, भोर विधानसभेतील प्रत्येक बांधवांची दिवाळी आनंदाने, समृध्दीने पार पडावी यासाठी किरण दगडे पाटील यांचा प्रयत्न आहे. दरवर्षी प्रमाणे ह्या दिवाळीत देखील आपला दिवाळी फराळ साहित्य उपक्रम मोठ्या उत्साहात पार पाडणार आहे.

मिळणारे साहित्य पुढील प्रमाणे…

1) रवा – 1 किलो 2) मैदा – 1 किलो 3) तेल – 1 किलो 4) भाजके पोहे – 1 किलो 5) पिठी साखर – 500 ग्रॅम 6) बेसनपीठ 500 ग्रॅम 7) डालडा 500 ग्रॅम 8) भाजकी डाळ – 200 ग्रॅम 9) मीठ 1 पॉकेट 10) चिवडा मसाला – 1 पॉकेट 11) मोती गुलाब साबण – 1 नग 12) पणती -1 पॉकेट 13) रांगोळी – 1 पॉकेट.

Advertisement

यासाठी नाव नोंदणी करून दिनांक 26 ते 30 सप्टेंबर कालावधीत कूपन वाटप करण्यात येणार आहे. वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्येक तालुक्यात किरण दगडे पाटील जनसेवा कार्यालयात मिळेल.

नागरिकांना कुपनसाठी आवश्यक कागदपत्रे :

1) रेशनकार्ड 2) आधारकार्ड 3) मतदानकार्ड लागणार आहे.

कुपन मिळण्याची ठिकाणे भोर विधानसभा.

भोर तालुका :

1) किरण दगडे पाटील जनसेवा कार्यालय भोर, राजवाडा कमानी शेजारी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँके समोर भोर.

2) किरण दगडे पाटील जनसेवा कार्यालय कापूरहोळ, साई स्पर्श बिल्डिंग, हॉटेल अमृता डिलक्स शेजारी.

मुळशी तालुका :

1) श्री विठ्ठल मंदिर हिंजवडी गावठाण हिंजवडी.

2) विमल गार्डन मंगल कार्यालय घोटावडे फाटा घोटावडे.

राजगड (वेल्हा) तालुका :

1) श्री किरण दगडे पाटील जनसेवा कार्यालय एम बी प्रॉपर्टीज, तोरणा हायस्कूल शाळेजवळ राजगड (वेल्हा).

किरण दगडे पाटील यांच्याकडून या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे. तुमच्या जनसेवकाची ही दिवाळी भेट नागरिक आनंदाने स्विकरतील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!