पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी : भोर तालुक्यातील साळव गावामध्ये जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान
भोर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त भोर तालुक्यातील साळव गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस ग्रामस्थांनी अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला. या वेळी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याबद्दल उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने भोर तालुक्यातील साळव गावामधील श्री नागेश्वर मंदिर परिसरात महाआरती व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने दक्षिण भागातील कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्यामार्फत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जयघोष करण्यात आला .
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी केलेल्या भारतभरामध्ये हजारो मंदिराचा जन्मोतर व सुशोभीकरणाच्या माहिती अध्यक्षां मार्फत देण्यात आली. यांच्या कार्याची प्रेरणा आजही समाजामध्ये सर्वत्र असल्याचे मत भाजपाध्यक्ष रवींद्र कंक यांनी व्यक्त केले.
यावेळी साळव गावातील शिव मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली,या स्वच्छता अभियानामध्ये ग्रामस्थ व पदाधिकारी मिळून दीडशे- दोनशे ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रसंगी सुप्रसिद्ध उद्योजक रमेश बुदगुडे, प्रगतिशील शेतकरी दिलीप कंक, बाबाजी साळेकर , समीर घोडेकर , सुरज चव्हाण , रोहन भोसले, संतोष साळेकर , सुनील जंगम , बाबू दिघे , सोपान शिंदे, मसर गावचे सरपंच संतोष गोळे, आपटी गावचे सरपंच शंकर पारठे, अंकुश भोसले, साळू गावचे उपसरपंच रामचंद्र साळेकर , भाऊ पारठे, शांताराम साळुंखे आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




