सामाजिक

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भोर तालुका यांच्या वतीने पोलिस आधिकाऱ्यांची आदरातिथ्य सेवा सुश्रुषा


भोर : दि. 19/09/24 गुरुवार (वार्ताहर) पोलिसांना कोणतेच सण, उत्सव साजरे करण्याचा आनंद घेता येत नसतो. प्रत्येकवेळी कोणत्याही सण-उत्सवा वेळी पोलिसांची सुट्टी देखील रद्द होते, त्यांना बंदोबस्तावर हजर रहावे लागते.

अंनत चतुर्थीनिमित्त गणेश विसर्जन मिरवणूक मधील पोलिस व होमगार्ड आधिकाऱ्याना पाणी व अल्पोपहार वाटप श्री स्वामी समर्थ सेवा दिंडोरी प्रणित केंद्र महाडनाका भोर यांच्या वतीने करण्यात आले. स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या वतीने २०% अध्यात्म व ८०% समाजकारण या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातात. यांचाच एक भाग म्हणून दि. १७सप्टेंबर२०२४ रोजी अनंत चतुर्दशीच्या निमित्त ग्रामअभियानांतर्गत ज्या कर्तव्यनिष्ठ अधिकारी वर्गामुळे सर्व सनोत्सव आणि मिरवणूका शांतेत पार पडतात, अशा पोलिस आणि होमगार्ड बंधूंना अल्पोआहार यावेळी देण्यात आला.

Advertisement

तसेच यावेळी पोलीस व होमगार्ड बांधवांनी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा देऊन श्री स्वामी समर्थ यांचे दैनदिन आरतीला येण्याचं निमंत्रण स्वीकारले.यावेळी कोणत्याही उत्सवाचा आंनंद आम्हाला घेता येत नसतो. मात्र आज गणेशोत्सवाचा आनंद साजरा करता येत असल्याचे समाधान आम्हाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भोर पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार सहाय्यक फौजदार विजयकुमार नवले, पोलीस हवालदार विकास लगस, पोलीस नाईक शौकत शेख, पोलीस नाईक अजय साळंखे, पोलीस कॉन्स्टेबल सुनिल चव्हाण, महिला पोलीस हवालदार सोनाली इंगुळकर, महीला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी जगताप उपस्थित होते.

तसेच भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सारंग शेटे, भोर एज्युकेशनचे अध्यक्ष प्रमोद गुजर, भोर तालुका मराठा समाज अध्यक्ष संजय भेलके पाटील, व स्वामी सेवेकरी, अक्षय धोत्रे, गौरव शिंदे, सुमित तारू, सुभाष शिंदे, अर्जुन पोटभरे, अतुल धुमाळ, साहिल चव्हाण, ओंकार सापे सर्व पोलीस व होमगार्ड बांधव उपस्थित राहिले होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!