सामाजिक

पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातुन पुण्यामध्ये 35 मंडळाचा संयुक्त दहीहंडी महोत्सव यशस्वीरित्या संपन्न


सचिन ढमाले.                                                                 प्रतिनिधी,पुणे.

पुणे :  पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून लाल महाल चौकात पुण्यातील 35 नामांकित सार्वजनिक गणेश मंडळे एकत्र येऊन दहीहंडी महोत्सव साजरा केला. या महोत्सवात सर्वसामान्य नागरिकांपासुन, फिल्मी दुनियेतील सितारे,सामाजिक कार्यकर्त्यांपासुन ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनी हजेरी लावली या अनोख्या उपक्रमाची सर्वसामान्य पुणेकरांनी दखल घेतली व पुतिन बालन यांचे तोंड भरून कौतुक केले, आभार मानले त्यांना दरवर्षी अशाच प्रकारे संयुक्त महोत्सव आयोजित करण्याकरितां शुभेच्छा दिल्या.

शहरातील चौकाचौकात होणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमांमुळे सर्वसामान्यांना होणारा नाहक त्रास,वाहतूक कोंडी आणि सुरक्षा व्यवस्था यामुळे पोलीस प्रशासनावर येणारा ताण लक्षात घेऊन तो टाळण्यासाठी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळा’चे उत्सव प्रमुख, विश्वस्त आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांनी 35 मंडळांना एकत्र आणत या संयुक्त दहीहंडीचा निर्णय घेतला होता, व आज तो सत्यात उतरवला

Advertisement

पुनीत बालन यांनी यासबंधीची माहिती दिली. गेल्या काही वर्षांपासून पुनीत बालन ग्रुप आणि गुरुजी तालीम मंडळ एकत्र येऊन दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करत होते. दरम्यान, शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर आहे. त्यातच मंडळांकडून प्रमुख रस्ते आणि चौकात दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होतात. सुरक्षा व्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो.                   तसेच प्रत्येक मंडळाने स्वतंत्र दहीहंडी कार्यक्रम आयोजित केल्यास ध्वनी प्रदूषणही वाढते. यावर युवा उद्योजक पुनीत बालन यांनी मंडळाना एकत्र येऊन संयुक्त दहीहंडी करण्यासंबंधीचे आवाहन केले होते.त्यांच्या या सामाजिक भावनेतून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील प्रामुख्याने मध्य पुण्यातील तब्बल 35 सार्वजनिक मंडळांनी पाठिंबा देत संयुक्त दहीहंडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार आज दि. 27 ऑगस्ट 2024 ( मंगळवार) रोजी लाल महाल चौकात संयुक्त दहीहंडी कार्यक्रम साजरा केला.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!