महेश शिंदे यांची राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या प्रवक्ते पदी निवड (अजित पवार गट)
पुणे : अजित पवार यांच्या खांद्याला खांदा लावून गेली 5 वर्षे धडाडीने काम करणारे पुणे शहरातील पद्मावतीचे महेश शिंदे यांची राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या प्रवक्ते पदी निवड करण्यात आली असल्याने महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता तसेच दलित संघटना, त्यांचे समर्थक यांनी आनंद व्यक्त केला आहे,
महेश शिंदे यांची धडाकेबाज भाषण शैली, सर्व सामान्याच्या प्रश्नाची जाण असणारे, कोणतीही सभा असो कोणतेही आंदोलन असो प्रस्थापित्यांवरती आपल्या भाषणातून टीकेची झोड उठवणारे, धारदार भाषणातून समोरच्याला सळोकिपळो करून सोडणारे, त्यामुळे आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला व अजित पवार यांना राज्यात आक्रमक चेहरा पाहिजे तसा मिळाल्याने त्यांच्यावरती आज राज्य प्रवक्ते पदाची जबाबदारी दिल्याने पुणे शहर,पुणे जिल्हा ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
महेश शिंदे हे गेले 30 वर्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते, 5 वर्षांपूर्वी त्यांनी रामदास आठवले यांच्यापासून वेगळे होत अजित पवार यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा पुणे शहर व पुणे ग्रामीण भागात रिपब्लिकन जनतेशी दांडगा संपर्क आहे.
निर्वाचित प्रवक्ता झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले की माझ्यावर पार्टीने जो विश्वास टाकला आहे त्यास कोठेही तडा जाऊन देणार नाही, प्रवक्ता पदास न्याय देऊ तसेच पार्टीत सेवा करण्याची जी संधी दिली आहे, त्याबाबत राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे, इतर सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.




