सामाजिक

भोर तालुक्यात प्रथमच 3000 विद्यार्थ्यांचा रास्ता रोको आंदोलनात सहभाग


वसंत मोरे,
प्रतिनिधी.

भोर : कापूरहोळ-भोर-मांढरदेवी या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्याचे काम एक वर्षापासून सुरू असल्याने भाटघर ते भोर या भागातील काम अपूर्ण असल्यामुळे तसेच पावसामुळे रस्त्याला पडलेले मोठ-मोठे खड्डे यामुळे प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, स्थानिक नागरिक,  शाळा प्रशासन, विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक यांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना लेखी व तोंडी माहिती देऊन सुद्धा रस्त्याचे काम करत नसल्याने वैतागून मंगळवार दिनांक 5 रोजी सकाळी 11 वाजता भोर येथील राणी लक्ष्मीबाई पुला जवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

कापूरहोळ -भोर रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते या रस्त्यावरील भाटघर- बुवासाहेबवाडी- भोलावडे- भोर या भागातील रस्त्यावर खड्ड्यांची साम्राज्य असल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले असून वाहनधारक आणि नागरिकांसह विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे, तसेच वाहनांचे खड्ड्यात आपटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

Advertisement

सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी सहायक अभियंता राज आजळे, योगेश मेटकर प्रकाश जाधववार आणि संबंधित ठेकेदार यांना एक महिन्याच्या आत एक बाजूचा तरी रस्ता पूर्ण करा आशा आदेश भोर तहसीलदार राजेंद्र नजन यांनी दिला. तसेच  प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी भोलावडे गावचे सरपंच प्रविण जगदाळे, राजा रघुनाथराव विद्यालयाचे 2500 विद्यार्थी, शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे 730 विद्यार्थी, भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार, एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रमोद गुजर, सचिव डॉक्टर सुरेश गोरेगावकर, मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे व मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे उपस्थित होते.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!