सामाजिक

चार चिमुकल्याचा शेत तळ्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू


आंबेगाव ता.प्रतिनिधी.                                                       विक्रम कांबळे

आंबेगाव : दि 24 दुपारच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील निरगुडसर गावात एका शेत तळ्यामध्ये चार मुलांचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली, या घटनेमुळे परिसरात हाळ-हाळ व्यक्त केली जात आहे

मृतामध्ये 3 मुली व 1 मुलगा होता, 1) राधिका नितीन केदारी (वय 14, राहणार कानेवाडी ता. खेड), 2) श्रद्धा काळू नवले (वय वर्ष 13), 3) सायली काळू नवले (वय 11वर्ष), 4) दीपक दत्ता मधे (रा. कानेवाडी ता. खेड) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. सध्या सर्व राहणार थोरात मळा निरगुडसर हे सर्व मुले दुपारच्या वेळेस आंब्याच्या झाडाखाली खेळत असताना ही घटना घडली. सुरज नवले या मुलाने सांगितल्या नंतर नवले पती पत्नीने बुडालेल्या मुलांना तळ्यातून बाहेर काढले, व उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथील रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील कांबळे, डॉ श्वेता गोराणे, डॉ अर्जुन दिघे यांनी सर्वांना तपासणी करत मुले मृत झाल्याचे घोषित केले,

Advertisement

उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फुगे, पारगाव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप पाटील, संचालक नामदेव थोरात यांनी कुटुंबियांची भेट घेत कुटुंबियांना आधार दिला. यातील श्रद्धा व सायली या दोन्ही मुलींना गोरक्षनाथ बबन कवठे (रा. जवळे बाळेश्वर ता. संगमनेर जि. अहमदनगर) त्यांनी दत्तक घेतली होती. हे सर्व मुले पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात शिकत होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!