चॅटींग वरुन झालेल्या वादातुन बिल्डींगच्या टेरेसहुन उडी मारुन महिलेची आत्महत्या
प्रतिनिधी, विक्रम कांबळे. आंबेगाव ता.
पुणे जिल्ह्यातील मंचर (ता. आंबेगाव) येथे महिलेने बिल्डींग वरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुनम जिग्नेश शिंदे (वय 34) असे मृत महिलेचे नाव आहे,
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना डोबी मळा मंचर येथे घडली आहे. नरेंद्र मारुती निघोट यांनी मंचर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. नरेंद्र निघोट यांची बहीण पुनम जिग्नेश शिंदे अष्टविनायक सोसायटी मध्ये पती व मुलासह दुसऱ्या मजल्यावर राहात होती. गुरुवारी पहाटे निघोट यांचे मेहुणे जिग्नेश शिंदे हे बहीण व भाचा यांना सोबत घेऊन घरी आले व तुमची बहीण ही दुसऱ्या मुलासोबत रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करत असल्याने सांगितले. त्यानंतर सकाळी नातेवाईकांना मंचर येथे बोलावून घेतले. बहीण ज्याच्याशी चॅटिंग करत होती. त्याच्याशी संपर्क केला. तेव्हा त्याने सायंकाळी तुमच्याकडे येतो असे सांगितले. नंतर त्या मुलाने फोन बंद केला,
सर्वजण घरात असताना पूनम ही बिल्डींगच्या टेरेसवर गेली व तिने टेरेस वरून खाली उडी मारल्यामुळे गंभीर जखमी झाली. तिला मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारा करता दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारा पूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. नरेंद्र मारुती निघोट यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी कांबळे या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.




