राजकीय

सावरदरे गावच्या सरपंचपदी गणेश साळुंखे यांची बिनविरोध निवड


 

सारोळे  : दि. २७. ( सोमवार ) सावरदरे ता. भोर ग्रामपंचायतीचे  सरपंच जितेंद्र साळुंखे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदाची निवडणुक झाली,त्यामध्ये गणेश साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी लहारे भाऊसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

सरपंच पदासाठी गणेश साळुंखे यांचा एकमेव अर्ज आल्याने लहारे भाऊसाहेब यांनी गणेश साळुंखे यांची सरपंच पदी बिनविरोध निवडीची घोषणा केली.

Advertisement

विद्यमान सरपंचाची निवड होताच त्यांनी सांगितले की सावरदरे गावामध्ये झपाट्याने विकास होत आहे. गावातील रस्ते, लाईट, पाणी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा याकडे विशेष लक्ष देणार आहे. व राहिलेल्या उर्वरित कामासाठी वाढीव निधी मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे, तसेच गावांमधील जेष्ट मंडळी, तरुण वर्ग,महिला भगिनी इतर मान्यवरांसह सर्व सदस्यांना बरोबर घेऊन राहिलेली कामे पूर्ण करणार आहे.गावच्या सर्वांगिण विकासा करिता आम्ही सर्वजण ग्रामपंचायत सदस्य कटिबद्ध आहोत.

गावात जलजीवनच्या माध्यमातुन पिण्याचे शुध्द पाणी, कचरा व्यवस्थापन, गावातील सर्व गटारे, वाडया-वस्त्याचे रस्ते ग्रामपंचायतिच्या माध्यमातुन बांधण्यात येतील,                       यावेळी मावळते सरपंच जितेंद्र साळुंखे, ग्राम सदस्य संदीप यशवंत साळुंखे ग्राम. उपसरपंच छाया पोपट पापळ,ग्राम. सदस्य मंगल अंकुश साळुंखे,ग्राम.सदस्य स्वाती युवराज कारळे,ग्राम सदस्य सुनीता राजेंद्र साळुंखे, उपस्थित होत.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!