एकतर्फी प्रेम प्रकरणातुन तरुणीचा खून
प्रवीण ननावरे, प्रतिनिधी.
खेड : आंबेठाण, ता.खेड, जि.पुणे येथे लग्नास नकार दिल्याने एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून करण्यात आला आहे. मयत तरुणीचे नाव प्राची विजय माने ( वय 21 वर्ष ) असुन ती कुटुंबा सोबत आंबेठाण,ता.खेड, जि.पुणे येथे राहत होती, तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा तरुण अविराज खरात हा तिला लग्नाकरीता वारंवार त्रास देत होता. ती त्याच्याशी लग्नासाठी तयार होत नसल्याच्या नैराश्यातुन त्याने तिचा खुन केला व त्या ठिकाणाहुन पळुन गेला होता.
रविवारी रात्री 11:15 वाजताच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाकडून म्हाळुंगे MIDC पोलीस ठाणे हद्दीत आंबेठाण येथे एका तरुणीचा खून झाल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असता आरोपीने प्राची हिचा खुन करुन पळुन गेला,त्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मोबाईल सोबत नेला होता. या गुन्ह्याच्या तपासाकरिता दोन पथके तयार केली. त्यातील एक पथक आरोपीच्या गावी तर दुसरे आरोपीच्या गाडीचा माग काढत होते.
आरोपी अविराज खरात हा साताराहुन कराड येथे येणार असल्याची माहिती एका पथकाला मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुमारे 15 किलोमीटर आरोपीचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन मोबाइल व दुचाकी ताब्यात घेतली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावरकर, उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, विठठल सानप, वीकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, रामदास मेरगळ, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, सुधिर दांगट, समीर काळे, शशिकांत नांगरे, राहुल सुर्यवंशी, तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.




