क्राईम

14 वर्षांनी झालेल्या जुळ्या मुलांच्या उपचारासाठी झटणाऱ्या बापाची गळफास घेऊन आत्महत्या


रोहित कुलकर्णी,                                                                 प्रतिनिधी.

नवी मुंबई : दि. 27 /7/24 (शनिवार) नेरुळ येथे वास्तव्यास असलेलं गाढे कुटुंबाला लग्नाला अनेक वर्ष झाली तरी त्याच्या आयुष्यात नव्या पाहुण्यांच्या आगमनाची दोघेही आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर लग्नाच्या 14 वर्षांनी गोड बातमी आलीच. गाढेंच्या घरात पाळणा हलला. पत्नीनं गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, जन्माला आल्यानंतर नवजात बाळांची तब्येत काहीशी नाजुक होती. त्यांना उपचारांची गरज असल्याने  नेरुळच्या तेरणा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.

नेरुळमधील तेरणा रुग्णालयात गाढे दाम्पत्याच्या बाळावर उपचार सुरू होते, नरेंद्र गाढेंनी सुरुवातीला 90 हजार रुपये भरले. पण तरी देखील रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार पैसे भरा,असा तगादा लावला जात होता. एवढंच नाहीतर आधी बिल भरलं नाही तर उपचार करणार नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडुन त्यांना सांगण्यात आले होते.

Advertisement

दोन्ही बाळं अतिदक्षता विभागात असल्याने उपचारांची गरज होती.पण रुग्णालय प्रशासनानं बिलासाठी लावलेल्या तगादा आणि नाजूक असणाऱ्या परिस्थितीला कंटाळून गाढे यांनी टोकाचं पाऊल उचललं. गळफास घेऊन आत्महत्या केली, नेरुळ महानगर पालिकेच्या वाचनालयासाठी ते सुरक्षारक्षक म्हणुन काम करत होते, आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहली आहे त्यामध्ये माझ्या मृत्यूस सर्वस्वी तेरणा रूग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचे म्हंटले आहे, दरम्यान या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात तेरणा रूग्णालया विरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!