क्राईम

दोन सख्या बहिण-भाऊ यांच्या खुनाचा अवघ्या 12 तासात उलगडा.


प्रतिनिधी,                                                             अजित सावंत,                                                 फलटण,सातारा.

दि. २५/०५/२४ (शनिवार) फलटण येथील दुहेरी खुनाच्या गुन्ह्याचा १२ तासांच्या आत उलगडा करुन आरोपीस जेरबंद करण्यात पोलीसांना यश आले आहे, पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.

निंभोरे, ता. फलटण गावचे हद्दीत पालखी महामार्गालगत पारधी समाजातील दोघे सखे बहिण-भाऊ सुमित तुकाराम शिंदे वय २० वर्ष व शितल तुकाराम शिंदे उर्फ शितल रणजित फाळके वय ३५ वर्ष दोघे रा. सुंदरनगर, निंभोरे, ता. फलटण यांचे मृतदेह रस्त्याचे कडेला मिळून आल्यावर लागलीच पोलीसांनी घटनास्थळी पाहणी केली असता दोघांच्या छातीवर धारदार व टोकदार भोकसल्यामुळे त्यातुन रक्तस्त्राव झाल्याचे दिसुन आले. सदर घटनेतील दोन्ही मृत व्यक्ती हे नात्याने सख्खे बहीणभाऊ आहेत. या दुहेरी खुनाचे कारण अस्पष्ट असल्याने हे खुन कोणी केले असावेत व कशासाठी केले असावेत याचीच सर्वत्र चर्चा होती, दोघांचे खुन अज्ञात व्यक्तीने केला म्हणून फलटण ग्रामीण पोलीस ठाणे मध्ये कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता,

Advertisement

सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन मा. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, मा. राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थागुशा सातारा, सुनिल महाडीक पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली तपास पथके तयार करुन मार्गदर्शन करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या, घटनास्थळावर काहीही धागेधोरे नसताना पोलीसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरु केल्यानंतर असे निष्पन्न झाले की, मयत स्त्री शितल तुकाराम शिंदे उर्फ शितल रणजित फाळके हीने दोन वर्षापुर्वी तिचा पहिला नवरा कनव-या भिम-या पवार रा. वाळवा, जि. सांगली यास सोडुन देऊन रणजित मोहन फाळके, मुळगाव सातारारोड, ता. कोरेगाव, जि. सातारा याचेबरोबर तिच्या आई-वडीला जवळ झोपडीमध्ये राहत होती. सदरची घटना घडले रात्री सुद्धा रणजित मोहन फाळके हा तिच्यासोबत झोपडीमध्ये झोपला होता. परंतु दोघांचे मृतदेह मिळून आल्यानंतर त्याने तेथुन पलायन केले होते. पोलीसांनी त्यास सातारारोड, ता. कोरेगाव येथुन ताब्यात घेऊन त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सुरुवातीला दिशाभुल करणारी माहिती सांगितली. परंतु पोलीसी खाक्या दाखवताच त्याने दि. २५/०५/२०२४ रोजी मध्यरात्रीचे सुमारास शितल ही झोपेतून उठुन परपुरुषा बरोबर कोठेतरी जात असल्याचे दिसल्यामुळे तो झोपडीतील चाकु घेऊन तिच्या मागोमाग गेला. काही अंतरावर गेल्यानंतर त्याने शितलला गाठुन तिच्या छातीवर चाकु खुपसुन तिचा खुन केला. त्यावेळी तिच्या आवाजांने तेथे असलेला तिचा भाऊ सुमित तुकाराम शिंदे यास त्याने अंधारात न ओळखल्यामुळे व त्याला तो परपुरुष आहे, असे समजून त्याने त्याच्याही छातीत चाकु खुपसून त्याचाही निघृण खून केला आहे. आरोपी रणजित मोहन फाळके, वय ४५ वर्ष यास अटक केली आहे. तपासामध्ये मयत बहीणभाऊ हे अनुसुचित जमाती (पारधी जाती ) या प्रवर्गातील असल्याचे व आरोपी रणजित मोहन फाळके हा खुल्या प्रवर्गातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ॲट्रॉसिटी कायद्यातील कलमांची वाढ केली आहे.                        पोलीस प्रशासनानी या दुहेरी खुनाचा गुन्हा १२ तासात उघडकीस आणुन आरोपीस तुरुंगात टाकले या त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे,

गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी केला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करीत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!