क्राईम

सतिश वाघ यांची हत्या पत्नीच्या अनैतिक संबंधातून : गेल्या वर्षभर हत्या करण्याचे प्रयत्न चालु होते


पुणे  : 9 डिसेंबर 2024 आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ मॉर्निंग वॉकला गेले असता अज्ञातांनी त्यांचे चारचाकीतून अपहरणकरून त्यांचा खून केला होता. त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात आढळून आला होता नंतर पोलिसांनी अपहरणकर्त्या चौघांना अटक केली होती. त्यांच्या तपासातून अक्षय जावळकरने त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे समोर आले होते. त्यालाही अटक केली होती.

सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांनी सुपारी देऊन हा खुन केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोहिनी वाघ यांना काल अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या संदर्भात पुराव्याच्या आधारे मोहिनी वाघ यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी या घटनेची कबुली दिली

Advertisement

सतीश वाघ यांच्याकडून होणारी मारहाण, आर्थिक व्यवहार हातात यावेत तसेच करणातील मुख्य आरोपी अक्षय जवळ याच्याशी असलेले अनैतिक संबंध यातून हा खून करण्यात आला आहे. अक्षय जवळकर हा वाघ यांचेकडे 15 वर्षांपासून भाडेकरू होता, यातून त्याची आणि मोहिनी वाघ यांच्याशी ओळख झाली होती आणि त्यांच्यात जवळीक झाली. दुसऱ्या बाजूला, सतीश वाघ हे मोहिनी यांना मारहाण करत होते. याच जाचाला कंटाळून मोहिनीने हे कृत्य करायचे ठरवले. या साठी 5 लाख रुपये हे अक्षय जवळकर यानेच इतर आरोपींना दिले. मात्र संपूर्ण कटामध्ये मोहिनी वाघ यांचा सहभाग होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणात आरोपी मोहिनी वाघ हिला न्यायालयाने 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मोहिनी वाघ हिला 30 डिसेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, सतीश वाघ हत्या करण्यासाठी आरोपी मोहिनी आणि अक्षय जावळकर यांच्याकडून गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरु होते, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!