क्राईम

राजगड पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे मोटारसायकल चोरांना पकडण्यात यश


 

कापूरहोळ : भोर तालुक्यात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढत असतानाच एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात राजगड पोलिसांनी दोघां मोटारसायकल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या ताब्यातून 40,000/- रुपये किंमतीची 1 मोटारसायकल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.

दि. 20/7/24 (शनिवार) रोजी कापूरहोळ परिसरातून अभय उत्तम बाठे यांची मोटारसायकल चोरीस गेली होती. याबाबत त्यांनी राजगड पोलीस ठाण्यात या गुन्ह्या संदर्भात फिर्याद दिली होती, या प्रकरणी राजगड पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी नाईक पोलीस नाना मदने यांना तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या, तपास करीत असताना राजगड पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकास गुप्त बातमीदारा मार्फत मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाली. सदर मोटारसायकल ही गुजरवाडी,कात्रज, पुणे याठिकाणी असल्याची पक्की खबर मिळाली होती, पोलीस नाईक नाना मदने यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करुन संयुक्तरित्या सापळा रचुन चोरांना त्याठिकाणी आल्यानंतर मोटारसायकल सह ताब्यात घेतले, पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शना खाली राजगड पोलीस आणि भारतीविद्यापीठ पोलीस यांनी संयुक्त कामगिरी केली.

Advertisement

त्यामधील आरोपीची नावे रोहित शेळके व अनिकेत माने अशी असुन दोघेही निंबोडी लोणंद,जि.सातारा. याठिकाणचे रहिवाशी असुन सद्या ते मित्रा कडे गुजरवाडी,कात्रज, पुणे. याठिकाणी राहात आहेत, सदर गुन्हा त्यांनी त्याच्या गावाहून पुण्याला जाताना केला आहे. अजुन त्यांनी काही गुन्हे केल्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढीलचा अधिक तपास पोलीस नाईक नाना मदने हे करत आहेत.

राजगड पोलीस नाईक नाना मदने त्यांच्या कामगिरी बाबत नागरिकानी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले व शुभेच्छा दिल्या, या आगोदर ही अशा अनेक गुन्ह्यामध्ये त्यांची कामगिरी ही कौतुकास्पद आहे.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!