संगमनेरच्या सरपंच सौ.सायली साळुंखे यांची पहिल्याच टर्ममध्ये उल्लेखनीय कामगिरी
सुनिल सावंत. प्रतिनिधी.
संगमनेर : संगमनेर,ता.भोर.महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण अमृत महाअवास अभियान पुरस्कार २०२२-२०२३ राज्य पुरस्कृत आवास योजना १५६ ग्रामपंचायती मधुन ग्रामीण तालुकास्तरीय सर्वात्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार प्रकारात संगमनेर ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांक मिळाला आहे.
संगमनेर ग्रामपंचायतीने पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य व शिक्षण विषयक सुविधा, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचा वापर, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, घरपट्टी पाणीपट्टी वसुली, महिला बालकल्याण व अपंगा वरील खर्च, ग्रामसभांचे आयोजन, सामाजिक दायित्व, एनईडी स्ट्रीट लाईट यांचा नियमित वापर, वृक्ष लागवड, जलसंधारण, ग्रामपंचायतीचे अभिलेखांचे संगणकीकरण, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, या सर्व लोक कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबवून तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार प्रकारात तालुक्यात तृतीय क्रमांक पात्र ठरली आहे.
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत या प्रकारात तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्हं संग्राम थोपटे आमदार भोर, राजगड(वेल्हा), मुळशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला, यावेळी माननीय गटविकास अधिकारी किरण कुमार, धनवडे भोर चे प्रांताधिकारी कचरे, भोरचे तहसीलदार श्री पाटील साहेब पंचायत समितीचे विस्तार अधिकारी घोगरे साहेब तसेच इतर शासकीय अधिकारी वर्ग या सर्वाःच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारताना संगमनेर गावच्या विद्यमान सरपंच सौ. सायली महेंद्र साळुंके, उपसरपंच प्रमोदआण्णा दशरथ बांदल, मा. सरपंच सौ. शर्मिला संतोष लोखंडे, ग्रामसेवक श्री नवनाथ चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सौ. लता सुरेश खामकर, ग्रा. सदस्य श्री.अमोल शेलार सामाजिक कार्यक्रम संतोष लोखंडे, महेंद्र साळुंखे यांच्या उपस्थितीत स्विकारला.
या पुरस्कारा बद्दल सरपंच, उपसरपंच, विद्यमान सदस्य, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे स्थानिक पातळीहुन कौतुक होत असुन त्यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.




