60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार : स्थानिक युवकांच्या सतर्कतेमुळे आरोपींना अटक
कापूरहोळ : पुणे सातारा महामार्गावर कापुरव्होळ,ता.भोर जि.पुणे येथील भोरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उड्डाणपुला खाली झोपलेल्या वृद्ध महिलेवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना बुधवारी (दि. 31 जुलै) घडली, सदर एक वृद्ध महिला विवव्स्त्रावस्थेत पुलाखाली रडत असल्याची माहिती हॉटेल कुणालच्या कर्मचाऱ्यांनी कापूरहोळ गावाचे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद देवघरे यांना दिली असता, त्यांनी सागर गाडे, हेमंत राऊत, समीर गाडे, रामदास लेकावळे या मित्राच्या मदतीने त्याठिकाणी जाऊन त्या महिलेस साडी वगैरे एका तरुणीच्या मदतीने नेसवण्यास दिली, महिलेस झालेल्या प्रकारा बाबत माहिती विचारली असता तिच्या बरोबर घडलेला प्रकार तिने सांगितला, देवघरे व त्यांच्या मित्रांनी पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांना फोन द्वारे झालेल्या प्रकरणा बाबत माहिती दिली असता, त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली, तसेच या स्थानिक युवकांनी आरोपींना पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले, या युवकांचे पंचक्रोशीमधील नागरिकांकडून कौतुक होत आहे, महिलेस राजगड पोलिस ठाण्यात नेल्यावर तिने याबाबत पोलिसांना माहिती देऊन दोन्ही आरोपींना ओळखले, ते दोघेही रात्री नशेत होते, या प्रकरणी पोलिसांनी सुधाकर उर्फ सुधीर बयाजी पवार (वय 38 वर्ष ) रा. कवळी, ता.औसा जि.लातुर व राजेंद्र हरिभाऊ यादव (वय 60 वर्ष ) रा. पुसेगाव ता. खटाव जि.सातारा, सध्या दोघेही राहणार पुणे- सातारा रोड कापुरव्होळ येथील उड्डाणपुला खाली या आरोपींवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. वृद्ध महिलेस उपचारासाठी पुणे जिल्हा रूग्णालय ससुन येथे पाठवण्यात आले असुन घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.




