सामाजिक

खेडशिवापुर टोल नाक्याबाबत आमदार संग्राम थोपटे आक्रमक


शिवापुर : पुणे – सातारा महामार्गावरील खेडशिवापुर टोलनाक्यावर आंदोलन करण्यसाठी दि. 3/8/24 (शनिवारी ) सकाळी 9 वाजल्यापासून कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. सर्वप्रथम दोन्ही बाजुच्या टोल बुथवर आंदोलन करून सर्व वाहने मोफत सोडुन देण्यात आली. त्यानंतर मुख्य टोल बुथवर काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम थोपटे यांनी शेकडो कार्यकर्त्यांनसह ठिय्या मांडला होता.

पुणे – सातारा महामार्गाच्या दयनीय अवस्थेबाबत संताप व्यक्त केला. रस्ता दुरुस्तीची लेखी हमी दिली तरी रस्ता दुरुस्त होई पर्यंत टोल वसुली बंदच ठेवावी, अशी अग्रही भूमिका  आमदार संग्राम थोपटे यांनी घेतली होती, त्यामुळे टोल प्रशासन व महामार्ग प्राधिकरणा पुढे पेच निर्माण झाला होता, त्यामुळे सकाळी 9  वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी 3 वाजेपर्यंत चालुच होते. दरम्यान, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी राजगड पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आंदोलनासाठी पुणे जिल्हा अध्यक्ष आमदार संजय जगताप उपस्थित होते, त्यांनी कॉग्रेस पक्ष पुर्णपणे स्थानिक नागरिकांच्या बाजुने असल्याचे म्हंटले,  रस्ता दुरुस्तीची लेखी हमी दिली तरी रस्ता दुरुस्त होईपर्यंत टोल वसुली बंदच ठेवावी लागेल, अशी अग्रही भूमिका आमदार संग्राम थोपटे यांनी घेतली होती.

Advertisement

तसेच जोपर्यंत पुर्ण खडे बुजवले जात नाहीत तोपर्यंत टोल आकारण्यात येऊ नये, रस्त्यावर मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या  नातेवाइकांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी, बुथवर काम करणारे गुन्हेगारी पार्श्वभुमीचे लोकं नसावेत, गाडीवाल्यांना नाहक त्रास देणाऱ्या कामगारांना समज देणे,अशा प्रमुख मागण्या राष्ट्रीय महामार्ग रस्ते प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याकडे केल्या होत्या,

टोल प्रशासना वतीने  रस्त्यावरील खड्डे 8 दिवसांत भरण्यात येतील, MH12 व MH14 गाड्यांना मोफत सोडण्यात येईल, गुन्हेगारी प्रवुतीच्या कामगारांना काम घेणार नाही तसेच खडयामुळे मृत्युमुखी पडलेल्याच्या नातेवाईकांना आर्थिक मदत कशी देऊ, टोल नाका शिवापुरहुन हलवण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला जाईल, अशी आश्वासन लेखी स्वरूपात भेटल्यानंतर  हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

याप्रसंगी शैलेश सोनवणे, लहुनाना शेलार, रोहन बाठे, दत्तात्रय बाठे, आनंद दळवी, महेश टापरे, महेंद्र साळुंखे, नानासो राऊत, गंगाराम मातेरे, ईश्वर पांगारे, अमोल पांगारे, सुरेश पांगारे, भोरचे तहसीलदार सचिन पाटील, हवेलीच्या निवासी नायब तहसीलदार स्वाती नरुटे, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, सर्कल व्यंकटेश चिरमुल्ला, तलाठी सी. पी. तांबोळी, राजगडचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी, खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे निमंत्रक माउली दारवटकर, सदस्य संजय जगताप आदी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!