संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांचे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कापुरहोळ येथे जंगी स्वागत
कापुरहोळ : मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर राज्यभरात फिरत आहेत. आज 11/8/24 (रविवार) सध्या ते मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली करत असुन त्यांनी सातारा जिल्ह्यातुन पुणे जिल्ह्यात येताना भोर तालुक्यातील पुणे-बेंगलोर हायवेवरील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कापुरहोळ गावातील छत्रपती संभाजी महाराजांची दुधाई वीर धाराऊमाता गाडे यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले.
यावेळी कापुरहोळ पंचक्रोशीतील सकल मराठा समाजातील बांधवाचा व महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला. साताऱ्यावरून निघालेली ही रॅली ठिकठिकाणी थांबत सकाळी 11 वाजता कापूरहोळ येथे पोहोचली असता रॅलीचे फुले उधुळुन व फाटक्याची आतषबाजीनी जंगी स्वागत करण्यात आले,कापुरहोळ गावचे सरपंच पंकज गाडे तसेच वीर धाराऊमाता ट्रस्टचे अध्यक्ष अमित गाडे यांनी मनोज जरांगे पाटलांचा पुष्पगुच्छ आणि छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार केला.
यावेळी ” एक मराठा लाख मराठा ” घोषणा देण्यात आल्या, कापुरहोळ गावामधील धाराऊमाता वंशज, धाराऊच्या लेकी – सुना यांची लक्षणिय उपस्थिती होती, तसेच पंचक्रोशीतील सरपंच,पोलीस पाटील, जेष्ठ नागरिक, तरुण वर्ग,सर्व पक्षाचे, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




