मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्या व इतरांनाही सांगा : जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे
गोविंद बोर्डीकर, प्रतिनिधी.
पुणे : पुणे जिल्हा परिषद मार्फत युवकांना मिळणार आता प्रशिक्षणा बरोबर विद्यावेतन म्हणुन दर महिना 10,000 रुपये, राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्याकरीता मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली असून नोकरी इच्छुक जास्तीत-जास्त युवानी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
या योजनेची प्रत्येक तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नोंदणी करता येईल. नोंदणीकृत उमेदवारांना शासकीय, निमशासकीय व खाजगी कंपनी मधील रिक्त जागा असतील त्या जागे करीता या योजने अंतर्गत अर्ज करू शकता.
या योजनेचा लाभ घेण्याकरीता उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी तसेच वय किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे. तो 12 वी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेला असावा. उमेदवाराचे आधार नोंदणी असावी व उमेदवाराचे आधार संलग्न बँक खाते असावे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी हा 6 महिन्याचा राहणार असून उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना प्रतिमाह 6 हजार रुपये, आयटीआय, पदविकाधारकांना 8 हजार रुपये, पदवीधर उमेदवारांना 10 हजार रुपये विद्यावेतन शासनामार्फत थेट उमेदवारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
उमेदवारांनी महास्वयंम संकेतस्थळावर ‘सीएमवायकेपीवाय ट्रेनिंग स्कीम’ अंतर्गत असलेल्या जाहिरातींकरीता ऑनलाईन अर्ज करावे.योजनेच्या अधिक माहिती करीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, 481 रास्ता पेठ पुणे या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्र. 020-26133606 वर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.




