राजकीय

संगमनेर येथे जागतिक आदिवाशी दिवस विविध उपक्रमातुन साजरा


सागर पढेर,                                                                प्रतिनिधी.

भोर : आदिवासी पाडा संगमनेर, ता. भोर, जि.पुणे. दि. 9/8/24 ( शुक्रवार ) महादेव कोळी वस्ती या ठिकाणी महादेव कोळी युवक संघटना व महिला मंडळ,जेष्ट नागरिक या सर्व समाज बांधवानी एकत्रित येऊन आदिवाशी दिवस मोठ्या उत्सवात साजरा केला.

आदिवासी समाजाचा इतिहास खूप जुना आहे, परंतु दुर्दैवाने आजही हा आदिवासी समाज जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेला आहे,ते या देशाचे मूळ रहिवासी असूनही सर्व घडामोडीत तो मागास आहे.त्यांच्या या मागासपणा दूर करून आदिवासी समाजाला विकासाचा वाटा मिळावा या उद्देशाने दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी ‘जागतिक आदिवासी दिन’ साजरा केला जातो. आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे संरक्षण करणे, तसेच त्याना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.

आज जग विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे, पण मुळाशी जोडलेला आदिवासी समाज आजही आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक बाबतीत मागासलेला आहे, आजही हा समाज सतत गरिबी, वंचित आणि सामाजिक अत्याचाराचा बळी ठरत आहे आदिवासी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या उद्देशाने 1994 साली प्रथमच संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. 23 डिसेंबर 1994 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत एक ठराव मंजूर करण्यात आला की 9 ऑगस्ट हा दिवस जगभरात जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जाईल.

Advertisement

जागतिक आदिवासी दिन हा आदिवासी लोकांचे हक्क आणि त्यांची सांस्कृतिक ओळख ओळखण्यासाठी समर्पित आणि वचनबद्ध आहे. आदिवासी समाजाबद्दल आदर व्यक्त करणे आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी जागतिक स्तरार जागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. य उद्देश आदिवासी समुदायांना त्यांच्या पारंपारित हक्कापासून संरक्षण करणे हा आहे, स्वाय सामाजिक न्याय मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहावे.

महादेव कोळी युवक संघटना सर्व समाज बांधव एकत्रित येऊन आदिवासी क्रांतिकारी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून आदिवासी पाडा संगमनेर येथील लहान मुलांनी क्रांतिकारक विषयी भाषण केले, तसेच इयत्ता 10 वी व 12 वी या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे मोफत वाटप करण्यात आले व लहान मुलांना शालेय वह्या इतर वस्तू व खाऊ वाटप करण्यात आला. त्यानंतर सर्वजणांनी मिळुन वस्तीमध्ये ठिक-ठिकाणी वृक्षारोपण केले. उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले,

आयोजकांनी सर्व समाजबांधावान समोर एक सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल सर्वच स्तरातुन त्यांचे आभार मानले जात आहे, व त्यांच्यावर पुर्ण भोर तालुक्यातील समाजाकडुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!