राजकीय

भोर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामजिक न्याय विभागाच्या तालुका अध्यक्षपदी अविनाश गायकवाड यांची फेर निवड


भोर  : भोर तालुक्यातील आपटी गावचे विद्यमान उपसरपंच अविनाश गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (AP) सामजिक न्याय विभागाच्या अध्यक्षपदी फेर निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने संपूर्ण राज्यपातळीवर हाती घेतलेल्या संघटनात्मक निवडणूक कार्यक्रमांतर्गत त्यांची फेरनिवड करण्यात आली.

अविनाश गायकवाड हे तालुक्यातील जुने कार्यकर्ते असून त्यांनी या पूर्वी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलमधुन ग्रामपंचायत निवडणूक लढवली असून ते सध्या आपटी गावचा उपसरपंच म्हणून कार्यभार पाहात आहेत साधारण एक वर्षापूर्वी त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांचा कामाचा अनुभव व आवाका पाहून भोर अध्यक्ष संतोष घोरपडे यांनी सर्वानुमते त्यांची भोर तालुका अध्यक्षपदी फेरनियुक्ती केली आहे.

Advertisement

स्वराज महाराष्ट्र न्युजशी बोलतांना त्यांनी सांगितले माझ्यावर विश्वास ठेवून पुन्हा जबाबदारी दिली याबद्दल पक्षाचे नेते, पदाधिकारी व सहकारी यांचे ऋण व्यक्त केले व पक्ष वाढीसाठी पक्षाचे काम करत राहील व समाज हितासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन असे सांगितले.

याप्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्ष श्री.प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष श्री.सुहास गरूड, भोर राजगड मुळशीचे आमदार श्री.शंकर भाऊ मांडेकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री.रणजीतदादा शिवतरे, भोर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री.संतोषजी घोरपडे, संचालक पीडीसीसी बँक भालचंद्र जगताप, मा.जि.प. सदस्य श्री.चंद्रकांतजी बाठे, मा.उपसभापती श्री.सुनिल भेलके, अध्यक्ष भोर शहर केदार देशपांडे, पुणे जिल्हा युवकचे अध्यक्ष अमित झेंडे, पुणे जिल्हा युवती अध्यक्षा देवकर, सरपंच प्रविण जगदाळे, अक्षय गायकवाड, निखिल गायकवाड, मंगेश ओव्हाळ, सरपंच संदीप शेलार, रणजीत रणखांबे, संतोष सातपुते तसेच भोर तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!