राजकीय

बारामती लोकसभा निवडणुक प्रक्रियेसाठी भोर प्रशासकीय यंत्रणा तत्पर : प्रांताधिकारी राजेंद्र कचरे


भोर: दि.18 (सोमवार) बारामती लोकसभा मतदासंघांत येणाऱ्या भोर विधानसभा मतदारसंघामध्ये भोर तालुका प्रशासकिय यंत्रणा निवडणुक प्रकियासाठी तयार असून त्यासाठी लागणारी यंत्रणा / यंत्रसामग्री सज्ज आहे, अशी माहिती निवडणुक प्रक्रियेसाठी पंचायत समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये भोर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की 15 भरारी पथक नेमले असुन त्यांचे 8 – 8 तासांच्या 3 शिप असणार आहेत, 12 एप्रिल पासुन 9 तपासणी नाके सुरू करणार आहोत, तसेच व्हिडीओ सिस्टीम द्वारा प्रचार सभेचे छायाचित्रण केले जाणार आहे, तसेच 70 निवडणुक अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे. यावेळी तहसिलदार सचिन पाटील उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!