राजकीय

डॅशिंग पत्रकार व समाजसेवक वैभव धाडवे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जाहिर प्रवेश


कापूरहोळ : दि. ३ नोव्हेंबर दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असलेले डॅशिंग पत्रकार, समाजसेवक वैभव धाडवे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात अधिकृत प्रवेश केला. पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला नवे बळ मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

वैभव धाडवे यांनी आपल्या प्रभावी लेखनशैलीने आणि निर्भीड पत्रकारितेमुळे वाचकवर्गात विशेष स्थान निर्माण केले आहे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांनी ग्रामीण भागातील अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी समस्यांवर प्रकाश टाकला. सरकार व प्रशासनापर्यंत हे प्रश्न पोहोचविण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले. त्यांच्या या पत्रकारितेच्या योगदानामुळेच समाजात त्यांची प्रतिमा निष्पक्ष व समाजाभिमुख पत्रकार म्हणून रुजली आहे.पत्रकारितेबरोबरच धाडवे यांनी शैक्षणिक, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Advertisement

‘शूरवीर मावळी संघटना’ या सामाजिक संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष असून, या माध्यमातून त्यांनी युवकांना संघटित करून समाजघटकांमध्ये एकात्मता, क्रीडा आणि संस्कृतीचा प्रचार केला आहे. ग्रामीण भागातील तरुणांना शिक्षण, रोजगार आणि नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे ध्येय त्यांच्या कार्यातून दिसून येते.

वैभव धाडवे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात समाजसेवा आणि पत्रकारितेचा अनुभव लाभणार असल्याचे पक्षनेत्यांनी सांगितले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजघटकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचे ध्येय त्यांनी जाहीर केले. “समाजातील वंचित घटकांचे आवाज उचलणे आणि सर्वसामान्य माणसासाठी न्याय मिळवून देणे हेच माझ्या राजकारणाचे ध्येय असेल,” असे धाडवे यांनी प्रवेशावेळी सांगितले.

या प्रसंगी कार्यकर्त्यांनी फुलांच्या वर्षावात त्यांचे स्वागत केले आणि नव्या राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या आगमनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बळकटीत भर पडेल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
समाजकारण, पत्रकारिता आणि युवकविकास या तिन्ही क्षेत्रांचा संगम असलेला हा प्रवेश आगामी काळात महत्त्वाचा ठरेल, असेही जाणकारांचे म्हणणे आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!