विद्या प्रतिष्ठानच्या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम साजरा
भोर : विद्या प्रतिष्ठान भोर इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आज 13 डिसेंबर 24 (शुक्रवार) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे,भोर तालुका विधी सेवा समिती व भोर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामानाने कायदेविषयक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती, तसेच कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थी सुरक्षा कायदेविषयक माहिती, मुलींविषयी कायदा, सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा अशा अनेक प्रकारची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती एन.के.नागरगोजे मॅडम (दिवाणी न्यायाधीश भोर तथा अध्यक्ष तालुका विधि सेवा समिती भोर) मार्गदर्शक – श्रीमती धनश्री सुर्वे मॅडम (वकील), सौ.श्रध्दा काटकर मॅडम (वकील संघटना सदस्य भोर), श्रीमती शीला खोत मॅडम (सह पोलीस निरीक्षक), कैलास आखाडे सर, किरण बोबडे सर (न्यायालयीन कर्मचारी),सर्वांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
• श्रीमती एन.के.नागरगोजे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना 2024 च्या कायदेविषयक माहिती सांगितली, कलम 112 चे महत्व वय वर्ष 18 चा कायदा व शिक्षा आपण आपल्या सुरक्षेसाठी काय करू शकतो ? अशा सर्व गोष्टींची माहिती सांगितली.
• श्रीमती. शीला खोत मॅडम यांनी निर्भया पथक ची माहिती तसेच आपल्या सुरक्षेसाठी कोणती काळजी घ्यायला हवी.जर आपल्याला असुरक्षित वाटत असेल तर आपण काय करू शकतो .याची माहिती दिली.
• विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अश्विनी मादगुडे मॅडम यांनी रेड बुक मेसेज तसेच आपण अडचणीत असल्यानंतर सुरक्षिततेसाठी सांकेतिक खुणा कशा प्रकारे करू शकतो अशा अनेक प्रकारची स्वतःच्या सुरक्षा विषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
• कायदेविषयक व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अश्विनी मादगुडे मॅडम यांनी तर कार्यक्रमाचे नियोजन केले व आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख रागिनी भोसले मॅडम व क्रीडाशिक्षक संतोष मादगुडे सर यांनी केले.
तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवीका गवंडी यांनी केले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कायदेविषयक व्याख्यानमाला कार्यक्रमासाठी सहकार्य केले.




