परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीमध्ये झालेल्या संशयास्पद मृत्यूचे खेडशिवापुर टोल नाक्यावर पडसाद
खेडशिवापूर : 10 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाची विटंबना करण्यात आली. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. परभणी व परिसरात तुफान दगडफेक, जाळपोळ झाली होती.
परभणी येथे झालेल्या संविधान विटंबनेच्या निषेधार्थ राज्यातून अनेक भीमसैनिक परभणी येथे दाखल झाले होते, एल एल बी चा अभ्यास करणारे पुणे जिल्ह्यातील चाकण येथील भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी हे ग्राउंड रिपोर्ट जाणून घेण्यासाठी अभ्यासाच्या माध्यमातून परभणी येथे दाखल झाले होते, परंतु पोलीस प्रशासनाच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये त्यांना देखील अटक करण्यात आली अटक झाल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली त्यातच ते मृत्युमुखी पडले या घटनेच्या निषेधार्थ आज खेड शिवापुर टोल नाका येथे हवेली भोर वेल्हा मधील आंबेडकरी पक्ष व संघटनांमध्ये काम करणाऱ्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने टोल बंदची हाक देण्यात आली होती.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष प्रवीण ओव्हाळ यांच्या नेतृत्वामध्ये हे टोल बंद आंदोलन करण्यात आले, यावेळी किशोर अमोलिक,विनोद गायकवाड,महेंद्र साळुंखे, सागर जगताप,अविनाश गायकवाड, आकाश ओव्हाळ,आकाश कांबळे, नवनाथ कदम,प्रदीप कांबळे, सुनील गायकवाड, स्वप्निल सावंत, आकाश गायकवाड असे अनेक भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




