शिक्षण

आळंदे येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शुभम बरदाडे बनला पोलीस उपनिरीक्षक


 

First Attempt Success: भोर तालुक्यातील आळंदे गावच्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शुभम चंद्रकांत बरदाडे याची लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली असुन त्याच्या यशामुळे परिसरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शुभम बरदाडेचे 1ली ते 4 थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले त्यांनतर पुढील शिक्षण 5 वी ते 12 वी (सायन्स) हे राजा रघुनाथराव विद्यालय व ज्युनिअर कॉलेज भोर येथे झाले असुन शिक्षण येथीलच संगमेश्वर माध्यमिक विद्यालयात झाले भीमाशंकर इंजीनियरिंगची पदवी त्याने सिंहगड कॉलेजमधून घेतली आहे, इंजिनिअरिंगची पदवी संपादन केल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२० साली घेतलेल्या परीक्षेतून पोलीस उपनिक्षक पदी निवड झाली.

Advertisement

नाशिक येथे शुभम बरदाडे याने प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तेथे झालेल्या दीक्षांत समारंभाला वडील चंद्रकांत बरदाडे, आई शैलेजा बरदाडे बहिण शुभ्रदा बरदाडे व मित्र परिवार उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या शुभमचे तालुक्यातील व आळंदे  ग्रामस्थांनी विशेष अभिनंदन केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!