भोर तालुक्यातील देवयानी बढे जर्मन परिक्षेत महाराष्ट्रामध्ये प्रथम
भोर : भोर तालुक्यातील हिर्डोशी गावच्या धोंडेवाडी येथील देवयानी बढे हीने जर्मन परिक्षेत महाराष्ट्रामध्ये प्रथम मिळवुन भोर तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. आई- वडिलांचे छत्र हरपलेल्या देवयानी बढे तिच्या अत्याकडे राहत असुन धोंडेवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवी इयत्ता मध्ये शिकत असताना तिने दिलेल्या जर्मन ऑलिम्पियाड (ए वन) ऑनलाईन परीक्षेमध्ये तिला ५० पैकी ५० गुण मिळाले असुन तिचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आला आहे.
जर्मन आणि फ्रेंच भाषेच्या फ्लोरा संस्थेकडून १ जूनला घेतलेल्या ऑनलाइन पद्धतीने परिक्षा घेण्यात आल्या होत्या, एक वर्षापासून सविता तनपुरे या शिक्षिका विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जर्मन भाषेचे धडे देत आहेत. जिल्हा परीषद शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांच्या मार्गदर्शनाखाली परकीय भाषा उपक्रम चालु केला होता,
तसेच, स्वरा धोंडे, साई शिरगावकर, जानवी धोंडे, सुधीर धोंडे, श्रेया शिरगावकर, आरव सस्ते हे विद्यार्थीही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यांना मुख्याध्यापक जयवंत जाधव, तनपुरे, अनिता पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
भोरचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, केंद्रप्रमुख अंजना वाडकर, विस्ताराधिकारी सुषमा पाटील, ग्रामपंचायत सदस्य सोपान धनावडे, विठ्ठल धोंडे, सीमा शिरगावकर, ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळ रघुनाथ पारठे, दत्तात्रेय सुतार, संकेत धनावडे, अंकुश भिलारे, सोपान धोंडे, स्नेहल देशमाने, कमल धनावडे, आशा शिरगावकर रघुनाथ पारठे, दत्तात्रेय सुतार, संकेत धनावडे, अंकुश भिलारे, सोपान धोंडे, स्नेहल देशमाने, कमल धनावडे, आशा शिरगावकर यांनी देवयानीचे कौतुक करून पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.




