मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरीता पुणे जिल्हा परिषदेची कमवा आणि शिका योजना
पुणे:पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे ‘कमवा आणि शिका’ योजना राबविण्यात येत आहे. योजने अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमध्ये तीन वर्षांसाठी प्रशासकीय कामांचा अनुभव मिळणार आहे, तीन वर्षे काम केल्यानंतर त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची पदवी देखील मिळणार असल्याची माहिती समाजकल्याण विभागाकडुन देण्यात येत आहे.
कमवा शिका योजनेतून अनुसूचित जाती,जमाती,भटक्या विमुक्त जाती जमातींच्या १८ ते २४ वयोगटातील पुणे जिल्हा ग्रामीण भागातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यालयात तीन वर्षे प्रशासना सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.
सन २०२४-२५ या वर्षामध्ये पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील निवडक गुणवंतांना कमवा आणि शिका योजनेअंतर्गत तीन वर्षे काम करता येणार आहे,मुक्त विद्यापीठाच्या बीबीए पदवी अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सेस फंडातून २० टक्के मागासवर्गीय निधीअंतर्गत विद्यावेतन देण्याची नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येते.
या योजने करीता आपण १५/७/२०२४ पर्यंत अर्ज करू शकता, अधिक माहितीकरीता पुढील नंबरवर ८९५६९०९५५९ संपर्क कार.




