जिल्हा परिषद शाळेमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने हृदय दिन साजरा
भोर : दि. 28/9/2024 (शनिवार) शिंद, ता. भोर, जि.पुणे जगभरात 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो.भारतात वाढत्या हृदय रोगाचे प्रमाण हे निश्चितच धोक्याची घंटा आहे. जर योग्य काळजी घेतली तर आपण हृदयरोगास निश्चितच टाळू शकतो.
यानिमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भोर यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळा बसरापूर, बारे, म्हाळवडी, बाजीप्रभू देशपांडे माध्यमिक विद्यालय शिंद, ता.भोर याठिकाणी बाल संस्कार उपक्रम अंतर्गत जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला, हृदय ठीक तर सगळे ठीक या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करुन समजेल अश्या साध्या सोप्या भाषेत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवक श्री संतोष कदम यांनी मार्गदर्शन केले.
हृदय विकारापासून बचाव करण्यासाठी मधुमेह,उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, बैठी जीवनशैली, अयोग्य आहार घेणे, तसेच व्यायामाचा अभाव या गोष्टीवर भर देणे गरजेचे असल्याचे कारण त्यांनी सांगितले, शिक्षक व विद्यार्थ्यांनी संतोष कदम सरांचे आभार मानले.
तसेच कार्यक्रमात श्री अतुल धुमाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांना श्री हनुमान चालीसाचे पठण करुन महत्त्व सांगितले.
यावेळी सौ नंदा भोमे, श्री महेश खुटवड, श्री नितीन इंगवले, श्री सचिन भालघरे, श्री कैलाश खुटवड, सौ नम्रता कोठावळे, श्री झांझले सरपंच बसरापूर, श्री राजेंद्र थोरवत उपस्थित होते.




