कापूरहोळ गावच्या श्री शिवाजी विद्यालयामध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा
कापूरहोळ : ५ सप्टेंबर देशभरातील विविध शाळांमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो, श्री शिवाजी विद्यालयात ‘शिक्षक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे सांस्कृतीक विभाग प्रमुख मालुसरे सरांनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून विदयार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका यशस्वीरित्या पार पाडून शाळेतील शिक्षकांना अध्यापनाच्या कामातून एक दिवस विश्रांती दिली.
श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व भाषणे केली. सर्व शिक्षकां करिता भेट वस्तूंचे आयोजन केले होते. तसेच शिक्षक दिनाचे अवचित साधत विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारुन शिक्षकांची सर्व कामे केली. विद्यार्थ्यांना शालेय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला, सर्व शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले आणि सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना फुले, हाताने बनवलेले कार्ड किंवा लहान भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.
शाळेचे मुख्याध्यापक यादव सरांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच विद्यार्थ्यांचे खुप कौतुक केले आणि शिक्षकांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या सत्कार केला. या सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाविषयी विचार व माहिती सांगितली आणि शिक्षकाविषयी सुंदर असे विचार मांडले.
यावेळी इयता १० च्या विद्यार्थिनीं सिद्धी कुंभार, पोर्णिमा देवघरे श्रावणी जाधव या तिघींनी शिक्षकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे केली, उपस्थितांमध्ये प्राचार्य यादव सर, माळी सर, भोसले सर,चांदगुडे सर, गायकवाड मॅडम, ढवळे मॅडम, रोकडे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख मालुसरे सर, खुटवड मामा, मारणे मामा इत्यादी लोक उपस्थित होते.




