सामाजिक

जाणता राजा प्रतिष्ठान व आदित्य बोरगे मित्रपरिवार यांच्यावतीने आयोजित “बालसंगोपन योजना” टप्पा ४ था लाभार्थ्यांची बस रवाना


कापूरहोळ : जाणता राजा प्रतिष्ठान आणि आदित्य बोरगे मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना शिबिरातील ४ था टप्यातील लाभार्थी पाल्य आणि पालक यांना बुधवार दि. १० सप्टेंबरला कापूरहोळ येथुन बसने पुढील कार्यवाहीसाठी पुण्यामधील कार्यालयात पाठवण्यात आले.

बाल न्याय अधिनियमानुसार महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियमानुसार अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या ० ते १८ वयोगटातील मुलां- मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटूंब उपलब्ध करुन देणे व संस्थेतील वातावरणा ऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणण्यासाठी राज्यात बालसंगोपन योजना सुरु करण्यात आली होती.

Advertisement

आदित्य बोरगे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की योजनेतंर्गत नुकतेच शासनाने प्रती बालक दरमहा देण्यात येणाऱ्या परिपोषण अनुदानात १ हजार १०० वरून २ हजार २५० तर स्वयंसेवी संस्थेच्या सहायक अनुदानात रु. १२५/- वरून रु २५०/- अशी वाढ करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अनुदानातून बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकीय सुविधा इ. सुविधा संबंधित कुटुंबांमार्फत पुरविण्यात येतात. तसेच स्वयंसेवी संस्थेने सहाय्यक अनुदान रकमेमधून दोन सामाजिक कार्यकर्ता व एक डेटा एंट्री ऑपरेटर यांचे मानधन, प्रत्येक बालकाची केस फाईल, त्यांचे संबंधित अभिलेख, दस्तऐवज इ. हाताळणी व संग्रहीत करण्याचा खर्च, देखरेख, गृहभेटी करीताचा प्रवासखर्च यासह सर्व प्रकारचा प्रशासकीय खर्च करण्यात येतो.  या योजनेपासून तालुक्यातील वंचित राहिलेल्याना पुढील टप्प्यात नेणार आहे असं ते म्हणाले.

यावेळी कसुर्डी गावचे सरपंच अजय मालुसरे,करंदी गावचे माजी सरपंच दत्तात्रय बोरगे,भाजपा तालुका अध्यक्ष संतोष धावले,भाजपा नेते अशोक पांगारे,प्रकाश बोरगे, युवा नेते सचिन द बांदल, कापूरहोळचे माजी सरपंच योगेश गाडे, उद्योजक अमित गाडे, श्याम आहिरे, बाळु फरताडे, वसंत गाडे, विनोद चौधरी, संदीप पांगारे सर,नितीन तनपुरे, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे सचिव शांताराम खाटपे,पोलिस पाटील विजय कव्हे आणि मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

 

 

<

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!