ताज्या घडामोडी

मुळशी-भोर मधील ५ कामांना १३२ कोटी ५० लाख मंजुर ! रस्ते उभारणीला येणार वेग : आमदार शंकर मांडेकर


पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  अजित पवार यांच्या माध्यमातून भोर-मुळशी-राजगड विधानसभा मतदारसंघतील ५ रस्त्यांच्या कामासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत १३२ कोटी ५० लक्ष रुपये मंजूर झाल्याची माहिती भोर-मुळशी-राजगड विधानसभा आमदार शंकर मांडेकर यांनी दिली.

Advertisement

आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील ५ कामांना निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये घोटावडे हनुमान चौक ते चाले ता. मुळशी प्रजिमा १२२ रस्ता सुधारणा करणे लांबी कि.मी ११/५०० ते १९ /००० रक्कम – ३५ कोटी रुपये, जांबे ते सांगवडे ता. मुळशी इजिमा ८१ रस्ताज सुधारणा करणे – लांबी कि.मी ११/३०० त १३/६५० रक्कम – ११ कोटी रुपये, भुकूम हायवे रस्ता ते आहिरे ता. मुळशी एम.डी.आर १११ रस्ता सुधारणा करणे – लांबी कि.मी ०/००० ते ४/००० रक्कम – १७ कोटी ५० लक्ष रुपये, संभवे – रावडे – भादस – करमोळी एम.डी.आर १२२ ता.मुळशी रस्ता सुधारणा करणे – लांबी कि.मी २२/००० ते ३५/००० कि.मी रक्कम – ६० कोटी रुपये,इत्यादी आहे.

तसेच भोर तालुक्यातील रा.मा ४ ते किकवी – केंजळ ता. भोर रस्ता एम.डी.आर १०२ सुधारणा करणे – लांबी कि.मी ५/७०० ते ७/६०० रक्कम – ९ कोटी रुपये मंजूर झाले असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामे सुरू होणार असल्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!