मा.पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने यांनी पुकारलेल्या उपोषणाला भोर-राजगड तालुक्यातील सर्व भटक्या विमुक्त समाजाचा जाहीर पाठिंबा.
खेडशिवापूर : दि. ९ सप्टेंबर (मंगळवार) खोपी ता.भोर येथिल पत्रकार परिषदेत भटक्या-विमुक्त समाजाचे नेते मा. पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने यांनी सांगितले की संपुर्ण महाराष्ट्रामध्ये विमुक्त समाजाच्या हक्कांसाठी गेली ५० वर्षं सुरू असलेल्या लढ्याला नवी दिशा देण्यासाठी येत्या बुधवार, १० सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. पुर्व अस्पृश्यांच्या खालच्या जमातीतले आम्ही आहोत. हा अन्याय दूर केला तर या समाजाला समाजाच्या मुख्यप्रवाहात येता येईल.
भटका विमुक्त समाज हा बलुतेदार नाही किंवा गाव गाड्यातला नाही. हा समाज गावकुसाबाहेर लांब रानावनात राहणारा आहे. मुळचे हे सगळे आदिवासी आहेत. १८७१ च्या गुन्हेगार जमाती कायद्याने यांना कलंकित केले होते. भिक मागणे, चोऱ्या माऱ्या करुन पोट भरणे असे जगणाऱ्या माणसांना ओबीसींच्या यादीमध्ये घालणे हा या समाजावर झालेला मोठा अन्याय आहे. हैद्राबाद गॅजेट मधील ऐतिहासिक नोंदीच्या आधारावर बहुसंख्य मराठा समाजाचा कुणबी मराठा म्हणून समावेश करण्यास राज्य सरकार तयार झाले आहे. सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. परंतु, त्याच “हैद्राबाद गॅजेटच्या ऐतिहासिक नोंदी मध्ये भटक्या विमुक्त समाजाची नोंद ही आदिवासी समाज अशी आहे. त्यामुळे याचं आधारावर महाराष्ट्रातील सर्व भटक्या विमुक्त समाजातील एकूण ४२ जाती जाती-जमातींचा समावेश आदिवासी मध्ये म्हणजेच अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात करावा अशी मागणी त्यांनी या वेळी केली. या मागणीसाठी मा. पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करत आहेत.
प्रशांत माने अध्यक्ष भटक्या विमुक्त जाती-जमाती भोर-राजगड संघटना यांनी यावेळी बोलतांना सांगितले की गेली ५० पन्नास वर्षांपासून भटक्या विमुकतांच्या कल्याणासाठी झाटणाऱ्या आमच्या नेत्याच्या उपोषणला आमचा पूर्ण पाठिंबा आणि समर्थन आहे. ५० वर्षे सातत्याने हा संघर्ष सुरु आहे. परंतु या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नव्हते. शासनाने आता सामाजिक न्यायाची भुमिका घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा. यासाठी आम्ही या उपोषणात बहुसंख्येने सहभागी होऊन. मा.पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने साहेबांना पूर्ण पाठिंबा देत आहोत असे जाहीर केले.
यावेळी अध्यक्ष- प्रशांत माने, उपाध्यक्ष- संदीप जाधव,कार्याध्यक्ष- धनाजी माने,सरचिटणीस- बापु माने तसेच आजी-माजी पदाधिकारी महिला वर्ग उपस्थित होते.




