ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती संताजी घोरपडे यांची ३८१ वी जयंती भक्तिभावात साजरी ! घोरपडे परिवारासह शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती


भोर : हिंदवी स्वराज्याचे महापराक्रमी सरसेनापती, स्वराज्याचे निष्ठावंत रक्षक आणि अद्वितीय युद्धनीतीचे धनी असलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे महाराज यांची ३८१ वी जयंती घोरपडेवाडी (आंबवडे), ता. भोर येथे उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.

जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज आणि सरसेनापती संताजी घोरपडे महाराज यांच्या पुतळ्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी स्वराज्याच्या रक्षणासाठी संताजी महाराजांनी गाजवलेला अतुलनीय पराक्रम, त्यांची शौर्यगाथा, स्वामीनिष्ठा आणि लढाऊ बाणा यांचे स्मरण करण्यात आले.

Advertisement

पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी स्वराज्याच्या रक्षणासाठी संताजी महाराजांनी गाजवलेला अतुलनीय पराक्रम, त्यांची शौर्यगाथा, स्वामीनिष्ठा आणि लढाऊ बाणा यांचे स्मरण करण्यात आले.

इतिहासातील या पराक्रमी योद्ध्यांच्या कार्यातून नव्या पिढीने प्रेरणा घेऊन स्वराज्याचा गौरवशाली इतिहास जपावा, असा भाव यावेळी उपस्थितांच्या अभिवादनातून व्यक्त झाला.

या प्रसंगी दीपक घोरपडे, नितीन घोरपडे, राजेंद्र घोरपडे, पंढरीनाथ घोरपडे, कुंडलिक घोरपडे, विशाल घोरपडे, नवनाथ घोरपडे, सुनील घोरपडे, नामदेव घोरपडे, प्रकाश घोरपडे, तुकाराम घोरपडे, रामदास घोरपडे, संदीप घोरपडे, दशरथ रवळेकर यांच्यासह ओम, अंकुश, आयुष घोरपडे आदी उपस्थित होते. समस्त घोरपडे परिवारातील सदस्य आणि स्वराज्यभूमी बारा मावळमधील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!