ताज्या घडामोडी

भोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासाला नवी दिशा ! २७ व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन !! शेतकऱ्यांसाठी हक्काची बाजारपेठ


भोर : दिपावलीच्या मंगलमय शुभमुहूर्तावर भोर येथील लोकनेते मा.अनंतरावजी थोपटे मुख्य बाजार आवारात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन २७ व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन करून विकासकामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भोर-राजगड-मुळशीचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी बाजार समितीच्या आधुनिकीकरणातून शेतकरी आणि व्यापाऱ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला.

कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून बाजारपेठेचा विस्तार व आधुनिकीकरण ही काळाची गरज आहे. नवीन गाळ्यांमुळे व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी अधिक जागा आणि सुविधा उपलब्ध होतील. या विकासकामामुळे भोर शहरासह तालुक्यातील व्यापारालाही चालना मिळणार आहे.

Advertisement

यापुढील काळात बाजार समितीच्या माध्यमातून उच्च प्रतीच्या इंद्रायणी भातापासून नामांकित इंद्रायणी तांदूळ निर्मिती, सोयाबीनपासून तेलनिर्मिती प्रकल्प तसेच बांबू खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापारी व शेतकऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. यातून बाजार समितीचे उत्पन्न वाढण्यासह शेतमालाला हक्काची बाजारपेठ निर्माण होण्यास मदत होणार आहे.

यावेळी पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष शेखर वढणे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!