शिक्षण

राजगड तालुक्यातील कन्या शुभा रेणुसेची NASA भेटीसाठी निवड


राजगड (वेल्हा) : दुर्गम व डोंगरी भागातील पाबे येथील शाळेतून शिक्षण घेणारी शुभा नवनाथ रेणुसे हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन केले आहे. वडिलांचे छत्र हरवले असूनही तिने शिक्षणात उत्तम कामगिरी करून राजगड तालुक्याचा मान उंचावला आहे.

महाराष्ट्रातून घेण्यात आलेल्या १७५१ विद्यार्थ्यांच्या परीक्षेतून ५१ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यामधून राजगड (वेल्हा) तालुक्यातील ४४ विद्यार्थ्यांमधून केवळ शुभा हिची निवड अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था (NASA) भेटीसाठी झाली आहे.

Advertisement

या यशामुळे शुभा ही राजगड तालुक्यातील एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. तिच्या निवडीने केवळ कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढवला आहे. शुभा हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध क्षेत्रांतून तिच्यावर शुभेच्छा व अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!