कात्रज घाटामध्ये राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला
शिंदेवाडी : कात्रज घाट परिसरात भोर तालुक्यातील शिंदेवाडी गावच्या हद्दीत मध्ये जुन्या कात्रज बोगदा कडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला डोंगरा कच्चा रोडला सौरव स्वामी आठवले (वय २५ वर्ष) सध्या राहणार मांगडेवाडी, पुणे मुळगाव औडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर याचा मृतदेह आढळला आहे, अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराच्या साह्याने त्याचा खून केला आहे,
संग्राम स्वामी आठवले (वय २८ वर्ष) राहणार मानाजीनगर, पुणे यांनी अज्ञात व्यक्तीच्या नावाने राजगड पोलीस स्टेशनमध्ये या घटनेबाबत फिर्याद दिली आहे. सौरवच्या मृतदेहाच्या जवळच त्याची टू व्हीलर होती, त्याच्या अंगावर, पोटावर, पाठीवर, डोक्यात जखमा असुन त्याच्या उजव्या हातचे एक बोट ही तुटलेले दिसत आहे, काल संध्याकाळी सोमवारी (दि.१८) त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार कात्रज पोलीस चौकीमध्ये दिली होती.
घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसुन राजगड पोलीस पुढील तपास करत आहेत.




