शिक्षण

सुर्वे कोचिंग क्लासेसचा दहावीचा निकाल 100% -: दिव्या कोंडेचा प्रथम क्रमांक


समीर शेख,
नसरापूर.

नसरापूर : सुर्वे कोचिंग क्लासेस नसरापूर ता.भोर जिल्हा पुणे यांचा सन 2024 – 25 या वर्षाचा इयत्ता दहावीचा निकाल 100% लागला आहे. सुर्वे कोचिंग क्लासेसमध्ये असणारे विद्यार्थी नसरापूर पंचक्रोशीतील विविध शाळांमधील असून या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून स्वतःचे आणि क्लासचे नाव उज्वल केले आहे. क्लासच्या बाबत अभिमानास्पद बाब म्हणजे क्लासमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत यश संपादन करून क्लासची पहिल्या वर्षीच शंभर टक्के निकालाची परंपरा सुरू केली आहे. क्लासमध्ये असणाऱ्या तज्ञ शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कष्टाचे हे फलित असल्याचे सुर्वे कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक योगेश सुर्वे यांनी म्हटले आहे.

Advertisement

सुर्वे कोचिंग क्लासेसमधील 17 विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावीची शालांत बोर्ड परीक्षा दिली होती. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. क्लासमध्ये शिकणारे विद्यार्थी हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय गटातील असुन क्लासेसचे प्राध्यापक योगेश सुर्वे व इतर शिक्षक या सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन या विद्यार्थ्यांना दहावीचा परिपाठ दिला होता. शिक्षकांनी घेतलेल्या अभ्यास व विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत यामुळेच हे शंभर टक्के यश प्राप्त झाले आहे. सुर्वे कोचिंग क्लासची कु. दिव्या दत्तात्रय कोंडे हिने 94.40% गुण मिळवून नवसह्याद्री गुरुकुल स्कूलमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे, सुर्वे कोचिंग क्लासच्या वतीने प्राध्यापक योगेश सुर्वे यांनी  इयत्ता दहावी मधील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

सुर्वे कोचिंग क्लासेसचे दहावीचे यशस्वी विध्यार्थी
• दिव्या कोंडे (कामथडी) – 94.40%
• प्रांजल शिळीमकर (तांभाड) – 93.00%
• जय पवार (नसरापूर) – 91.20%
• संस्कार पाटील (नसरापूर) – 82.40%
• वेदिका चव्हाण (हरिश्चंद्री) – 82.20%
• वेदांत कुंभार(नसरापूर) – 80.20%
• सानवी बांदल (खडकी) – 79.00%
• वैभवी शिंदे (चेलाडी) – 77.80%
• जयंती रसाळ (चेलाडी) – 77.40%
• अथर्व गाडे (कापूरहोळ) – 74.00%
• तनिष्का धुमाळ (कामथडी)- 73.20%
• विघ्नेश शिळीमकर (नसरापूर)- 71.20%
• श्रावणी बांदल (खडकी) – 67.20%
• ओम मोरे (वर्वे) – 65.60%
• अरमान शेख (कापूरहोळ) – 65.40%
• बलराम यादव (नसरापूर) – 61.80%
• भार्गव भोसले (नसरापूर) – 55.80%

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!