भोरच्या राजकारणातील डावपेच खेळणारा पैलवान मैदान मारणार ?
भोर प्रतिनिधी : महाराष्ट्रात निवडणुकीचे पडघम चालू आहे. मतदान आता आठ दिवसावर आल्याने उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत.राजकारण हे क्षेत्र मुळातच सर्वसामान्यांना तिटकारा येणारं क्षेत्र आपल्यासाठी इथं काहीच नाही, आपल्या हितासाठी निर्णय घेणारं, आपली बाजू मांडणारं कुणीच नाही’ ही भावना बळावून दररोजच्या जगण्याचा प्रश्न यक्ष बनून ज्यांच्या समोर उभा असतो असा तळागाळातला घटक मग राजकारणाकडे, राजकारणी व्यक्तींकडे कानाडोळा करतो. मात्र काही समाजातही अपवाद असतात. तसाच अपवाद असणारे, सर्वसामान्यांप्रती कणव असणारे आणि सरळ स्वभावी व्यक्तीमत्व म्हणजे पै.कुलदीप कोंडे होय.
राजकारण हे तसं डावपेचांचं क्षेत्र ! पण ते डावपेच हे फक्त निवडणूकीच्या काळापुरतेच असावेत आणि तसंच आचरण करणारे कोंडे जेव्हा कधी जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायची वेळ येईल तेव्हा ‘तुझं माझं न करता सर्वसामावेश करित्या हित जोपासण्यावर त्यांचा भर राहिलेला आहे. मनात कुणाबददलही कटूता, द्वेष, वैरभाव न जोपासता सरळमार्गी वाटचाल करण्यावर सातत्याने त्यांचा भर राहिलेला आहे. राजकारणात डावपेच न खेळता मैदान मारणारा पैलवान म्हणून भोर,राजगड,मुळशी तालुक्यातील युवक वर्ग,ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ साथ देतील असे चित्र दिसत आहे. कुलदीप कोंडे यांना विद्यार्थी दशेपासूनच शिक्षण, क्रीडा, साहित्य, कला,कुस्ती क्षेत्रातील व समाजकारणाप्रती आवड असल्याने विकासाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवली. जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी वेळू भोंगवली गणाचा कायापालट केला. क्रीडा, कुस्ती क्षेत्रात अनेक तरुणांना प्रोत्साहन दिले. खरं म्हणजे कुलदीप कोंडे हे व्यक्तिमत्व आधुनिक काळातील “शेतकरी पुत्र” असल्याने भोर, राजगड, मुळशी तालुक्यातुन त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कुलदीप कोंडे यांना २०१४, आणि २०१९ निवडणूकीत पराभव होऊनही आजवर त्यांनी जनतेशी असणारी नाळ तुटू दिली नाही. हारजीत हे आयुष्याचे अविभाज्य अंग मानून त्याचा प्रवास सुरूच आहे. राजकारणात पराभव व विजय होत असतो मात्र यंदा अपक्ष असून सुद्धा “शेतकरी पुत्र “कुलदीप कोंडे “जनतेच्या मनातील आमदार राहणार आहेत हे चित्र दिसते.
दरम्यान भोर, राजगड, मुळशी मतदारसंघात पराभव झाल्याने न डगमगता मोठया जोमानं तालुक्यात सर्वांशी संपर्क कायम ठेवला. जिल्हा परिषद गणातील प्रत्येक गावा -गावात रस्ते, पाणी, विज या मुख्य प्रश्नांना अजेंड्यावर घेऊन ते तातडीने मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्राधान्यक्रम दिला.
पण असं म्हणतात ना खायला नाही नसतो परंतु जनतेच्या दरबारात न्याय नक्कीच मिळतो. यामुळेच मतदारसंघातील जनतेने त्यांना खंबीरपणे साथ देऊन अपक्ष लढवण्याचा निर्धार केला आहे व विजयी करण्याचा इरादा पक्का केला, हे वास्तव मात्र सत्य आहे. यामुळेच या मतदारसंघात “शेतकरी पुत्र “पै.कुलदीप कोंडे” यांची “रिक्षा “येणारच असा विश्वास जन माणसात आहे.




