भाजपा उत्तर भोर तालुका अध्यक्षपदी संतोष धावले तर दक्षिण अध्यक्षपदी रविंद्र कंक ; भोर शहर अध्यक्षपदी पल्लवी फडणवीस
कापूरहोळ : भोर तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्षपदी कुणाची निवड होणार याबाबत कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. सध्या भाजप सत्तेत असल्याने या निवडीकडे गांभीर्याने बघितले जात होते, आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता, भाजप भोर उत्तर तालुकाध्यक्षपदी संतोष रामचंद्र धावले तर भोर दक्षिण अध्यक्षपदी रविंद्र धोंडिबा कंक तर भोर शहर अध्यक्षपदी पल्लवी प्रमोद फडणवीस यांची निवड करण्यात आली आह़े.भारतीय जनता पार्टी भोर तालुका अध्यक्ष पद निवड बैठक हॉटेल जय महाराष्ट्र कापूरहोळ, तालुका भोर येथे पार पडली यावेळी तालुका निवडणुक निरिक्षक म्हणुन माऊली चौरे तर भोर शहर निवडणुक निरिक्षक म्हणुन गिरीष जगताप यांनी काम पहिले.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणूक होणार आहे. या काळात असलेल्या भाजप तालुकाध्यक्षाला महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे. या पदावर आपली निवड व्हावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले होते. मावळते अध्यक्ष जीवन कोंडे यांचा कार्यकाळ पुर्ण झाल्यामुळे या अध्यक्ष पदाची विभागीय निवड करण्यात आली.
यावेळी भाजपा उपजिल्हाअध्यक्ष बाळासाहेब गरुड, जीवन कोंडे, विश्वास ननावरे, राजेंद्र गुरव, समीर घोडेकर, सुनिल पांगारे, मारुती धोंडे, सचिन मांडके,दत्तात्रय झांजले, विष्णू कांबळे, शरद लोहार, संतोष लोहकर, भाजपा तालुका कार्यकारणी आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
• भोर तालुका उत्तर अध्यक्ष या पदाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पक्षाने दाखवलेला विश्वास, दिलेली जबाबदारी चोख पार पडून, उत्तर भोर तालुक्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे बोलताना नवनिर्वाचित उत्तर भोर तालुका अध्यक्ष संतोष धावले यांनी स्वराज महाराष्ट्र न्यूज़शी बोलताना सांगितले.
• भोर तालुका दक्षिण अध्यक्ष या पदकरिता जनता पार्टीच्या नेते मंडळी माझ्यावर विश्वास टाकला तो सार्थ ठरविण्यासाठी पार्टीने जो कार्यक्रम दिला तो प्रभावीपणे राबविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित भोर तालुका दक्षिण अध्यक्ष यांनी स्वराज महाराष्ट् न्यूज़शी बोलताना दिली आहे.




